esakal | कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात सात पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३९८ वर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी (ता. दोन) सकाळी २८ आणि सायंकाळी ५१ असे दिवसभरात ७९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात सकाळी पाच तर, सायंकाळी दोन असे दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढुळुन आले

कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात सात पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३९८ वर

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी (ता. दोन) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णांची संख्या आता ३९८ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. गुरुवारी पुन्हा पाच रुग्ण पॉॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ३९८ इतकी झाली आहे. 

गुरुवारी (ता. दोन) सकाळी २८ आणि सायंकाळी ५१ असे दिवसभरात ७९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात सकाळी पाच तर, सायंकाळी दोन असे दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढुळुन आले आहेत. यापैकी निजाम कॉलनी, खुदबईनगर येथील ६० व ४० वर्षाच्या दोन महिलांचा तर, जुना मोंढा (वय ३६), हैदरबाग (वय ५३), म्हाडा कॉलनी (३५), आंबेडकरनगर (८०) आणि मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील एका ३० वर्ष अशा पाच पुरुष मिळून सात बाधितांचा यात समावेश आहे. एकुण प्राप्त झालेल्या अहवाल पैकी ५८ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले तर, नऊ अहवाल अनिर्णित अवस्थेत ठेवण्यात आले असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा - बाभळीचे पाणी तेलंगणा राज्यात; एक दरवाजा उघडला

२९८ रुग्ण कोरोनामुक्त

गुरुवारी दिवसभरात सात बाधितांची भर पडली असली तरी, पंजाब भवन कोविड केअर सेंटर मधील तीन, विष्णुपुरीच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील एक व औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेले दोन असे एकुण सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. त्यामुळे बाधीत रुग्णसंख्या ३९८ इतकी झाली असून, गुरुवारी संध्याकाळपर्यंत २९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ८३ बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहे. तर आत्तापर्यंत १७ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ९० स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळपर्यंत अहवाल येण्याची शक्यता असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले.

हेही वाचा - Video - नांदेडात भाजपने केली वीज बिलाची होळी

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक

आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या बाधीत रुग्णांना उच्चरक्तदाब, मधुमेह आणि श्वासनाचा त्रास असल्यामुळे व उपचारास प्रतिसाद न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असलेले शेकडो रुग्ण कोरोनातुन मुक्त झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण संख्येत खंड पडत नसला तरी, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये व प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

loading image