कोरोना: वैद्यकीय असोसिएशनचे योगदान - कसे? ते वाचा

photo
photo

नांदेड: जगात थैमान घातलेल्या कोरोनाच्या महामारीने असंख्य सर्वसामान्य लोकांसमोर मोठे आव्हान उभं केलं आहे. या काळात शासन-प्रशासन, विविध सामाजिक संस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन गरीब, गजुंची सेवा केली. याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपत MSMRA (वैद्यकीय प्रतिनिधी, संघटना) यांच्याकडुन नांदेड जिल्ह्यात काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय प्रतिनिधी आणि नांदेड शहरातील सर्व पोलिस कर्मचारी व अधिकारी यांना आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथीक औषधीचे मोफत वाटप केले. 

कोविड-१९ या जागतिक महामारीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक सामाजिक संघटना सुद्धा जिकरीचे काम करत असून संकटात सापडलेल्या नागरिकांची सेवा करण्यात कुठेही मागे राहिलेल्या नाहीत.

शहरासह जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे हात समोर आले, अनेकजण आप आपल्या पद्धतीने सामाजिक दायित्व जपत एकमेकांस मदतीचा हात देत आहेत. शहरात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत वैद्यकीय प्रतिनिधी संघटनाही मागे नाही. सामाजिक बांधीलकी जपत, शहरात काम करणारे पोलिस व वैद्यकीय प्रतिनिधी अशा एकूण ७०० जणांना आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथीक औषधींचे मोफत वाटप केले. 

आयुषने अधिकृत केलेल्या अर्सेनिक अल्बम -३० या औषधीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, शहरात अतिशय जीकरीच्या व रहदारीच्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिस कर्मचारी तर अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी काम करत आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठलाही ठोस प्रतिबंधात्मक उपाय नाही किंवा कुठल्याही प्रकारची लस यावर उपलब्ध नाही. 

त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच एक रामबाण उपाय असुन त्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० हे होमिओपॅथी औषध उपयुक्त आहे. म्हणुन आज खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणरे पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळावे यासाठी हा गोळ्यांचे वाटप केल्याचे  MSMRA युनिट सेक्रेटरी श्याम पाटील वडजे यांनी सांगितले.  
            

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com