कोरोना इफेक्ट : मामामुळे भाच्यावर गंडांतर, लग्न रद्द, व्हावे लागले क्वारंटाईन

प्रल्हाद कांबळे
Sunday, 12 July 2020

मामाला कोरोनाची बाधा झाल्याने रविवारी (ता. १२) भाच्याचे होणारे लग्नात विघ्न आले. भाच्यालाही क्वारंटाईन केल्यामुळे रविवारी होणारे लग्न रद्द करण्यात आले आहे.

नांदेड : देगलूर शहरातील व्यापारी असलेल्या मामाला कोरोनाची बाधा झाल्याने रविवारी (ता. १२) भाच्याचे होणारे लग्नात विघ्न आले. भाच्यालाही क्वारंटाईन केल्यामुळे रविवारी होणारे लग्न रद्द करण्यात आले आहे. मामा पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईकांना क्वारंटाईन केले असून मामावर उपचार सुरू आहेत. 

देगलुर शहराच्या भायेगाव रोडवर सदरचा व्यापारी किरायाने राहतो. तो तेथेच हार्डवेअरचे दुकान चालवितो. तो व्यापारी अनेकांशी संपर्कात आल्याने त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो अहवाल शनिवारी (ता. ११) सकाळी कोरोना पॉझिटिव आला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी भीतीपोटी घर सोडले. तालुक्यातील कोरोना बाधीतांची आता आठवर गेली आहे. शनिवारी सकाळी पॉझिटिव आलेल्या ४६ वर्षे व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सतरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी नांदेडला पाठवून देण्यात आले आहेत.

हेही वाचाकोरोना इफेक्ट : वेटरसह मॅनेजरचेही कुटुंब पडले उघड्यावर

मुखेड तालुक्यातील मुळगाव एकलारा येथील रहिवाशी

विशेष म्हणजे या व्यापाऱ्याच्या परिवारात त्याच्या भाच्याचा विवाह रविवारी (ता. १२) जुलै रोजी होणार होता. परंतु नवरदेवासह सर्व नातेवाईकांना कॉरंटाईन व्हावे लागल्याने विवाह रद्द करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यातील मुळगाव एकलारा येथील असलेला व्यापारी देगलूर शहरातील भायगाव मार्गावर किरायाने परिवारासह राहतो. त्या व्यापाऱ्याचा शनिवारी सकाळी अहवाल पॉझिटिव आला. मात्र त्याच्या घरच्या सदस्यांना याबाबत पूर्वीच माहिती मिळाल्याने शनिवारी पहाटे बाधित व्यक्तींच्या घरातील मंडळींनी घर सोडून सुरक्षीतस्थळ गाठले आहे. 

त्या कुटुंबियाचा शोध पोलिस व आरोग्य विभाग घेत आहे

बाधित व्यक्तीच्या घरी जाऊन विचारपूस केली मात्र बाधित व्यक्तीच्या घरात कोणीच नव्हते. या बाधीताच्या संपर्कात किती जण आले याची माहिती आरोग्य विभागाला अद्यापपर्यंत मिळाली नाही.  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश देशमुख हे या प्रकरणात लक्ष घालून आहेत. त्यांनी सांगितले की, ता. १० जुलै रोजी सायंकाळी बाधित झालेल्या ४६ वर्षीय व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सतरा जणांचे (८ पुरुष व ९ महिला) तपासणीसाठी नांदेडला पाठवून देण्यात आले. शहरात ज्या व्यक्तींना बाधित होण्याची भीती वाटली असे थेट नांदेड गाठत आहेत. आजपर्यंत शहरातील पाच जणांनी नांदेड गाठले व तेथूनच स्वॅब तपासणीसाठी दिले आहेत. त्यात पाच जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect: Uncle rioted on niece, marriage canceled, had to be quarantined nanded news