कोरोना इफेक्ट : वजनकाट्यातून होतेय ग्राहकांची आर्थिक फसगत 

प्रमोद चौधरी
Friday, 16 October 2020

जिल्ह्यात वजनमापांची तपासणीच झाली नाही. परिणामी वजनकाट्यात सोयीची सेटींग करून दोषपूर्ण मोजमापाद्वारे ग्राहकांची फसगत होत असल्याची बाब समोर आली आहे. 

नांदेड : वजनमापे विभागाच्यावतीने दरवर्षी मार्चच्या शेवटी व्यापारी दुकानांमधील वजनमापे वैधमापन तपासणी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाउन लागल्याने चार महिने व्यापारी पेठा बंद होत्या. परिणामी जिल्ह्यात वजनमापांची तपासणीच झाली नाही. परिणामी वजनकाट्यात सोयीची सेटींग करून दोषपूर्ण मोजमापाद्वारे ग्राहकांची फसगत होत असल्याची बाब समोर आली आहे. 

जिल्ह्यात सध्या विविध दुकानदार, मुख्य व्यावसायिक, लहान कारखाने, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, बियाने व्यावसायीक, भाजी व फळ विक्रेते तसेच इतर लहानमोठ्या व्यावसायीकांकडे इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहे. त्याची मार्च महिन्या अखेरीस तपासणी करणे अपेक्षित होते. मात्र, देशात कोरोना संक्रमाणामुळे यावर्षी ही तपासणी झालेलीच नाही. 

हेही वाचा - नांदेड : पकडलेल्या त्या धान्याच्या ट्रकवर प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कारवाई

मार्चपासून जुलै महिन्यादरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण व्यापारीपेठा बंद होत्या. खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बंदल होते. व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे बजनकाट्यांची तपासणी प्रक्रिया खोळंबली. आज मोठ्या तसेच लहान दुकानांमध्ये जे वजनमापे वापरली जात आहे. त्यामधून ग्राहकांना दृष्टीस पडणारे वजन सदोष असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी विक्रीच्या व्यवहारात सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हेही वाचाच - विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको आंदोलन
 
अशी असते तपासणी प्रक्रिया 
जुने तराजू व वजन मापे प्रमाणित आहेत किंवा नाही याची तपासणी केली जाते. तसेच इलेक्र्टॉनिक काटे मागे सील केलेली प्लेटवर काट्याची पासिंग तसेच तारीख आणि सिलवर केलेली छेडखानी याचीही तपासणी केली जाते. वजन व वजन काट्यांमध्ये असलेले तफावत आढळल्यास तपासणी निरीक्षक पंचनामा करतो. अधिक तफावत जाणवल्यास जप्त करून त्यावर दंड आकारला जातो. 

येथे क्लिक कराच - हमीभावाने कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक

ग्राहकांनी सावध राहण्याची गरज 
बाजारपेठेतील बऱ्याच काट्यांचे पासिंगच नाही. शिवाय इलेक्ट्रॉनिक काटे तपासणी करून सील न झाल्याने या विद्युत काट्यांमध्ये सेटींग करून माप चुकविता येणे सहज शक्य आहे. माल, वस्तू सेवा खरेदी करताना दुकानदार, विक्रेते काटा मारू शकतात. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांची मोठी आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

दुकानदारांनी अशी घ्यावी काळजी 
वजन, काटे तसेच इलेक्ट्रॉनिक काट्यांची तपासणी करणे सक्तीचे आहे. ज्यांनी तपासणी केली नसले ती मापे अवैध मानली जातात. त्यांच्यावर कार्यवाही करून दंड आकारला जावू शकतो. त्यामुळे दुकानदारांनी पासिंगचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect Weight Loss Will Be Followed By Financial Fraud Nanded News