कोरोनाची कुंटूर पोलीस ठाण्यात इंट्री : एक अधिकारी पाच कर्मचारी पाॅझिटिव्ह

प्रभाकर लखपत्रेवार
Friday, 4 September 2020

कोरोनाने कुंटूर पोलीस ठाण्यातही इंट्री केली आहे अंटीजेन तपासणीत एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी पाँझिटिव्ह निघाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी दिली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. 

नायगाव -  कोरोना जिल्ह्यात दररोज नवीन नवीन उच्चांक करत असतांनाच ग्रामीण भागातही पाळेमुळे घट्ट रोवत असून. कोरोनाने कुंटूर पोलीस ठाण्यातही इंट्री केली आहे अंटीजेन तपासणीत एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी पाँझिटिव्ह निघाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी दिली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. 

एकेकाळी नांदेड जिल्हा ग्रीण झोनमध्ये होता. तब्बल तीन महिने कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला नव्हता मात्र तेव्हापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्न सापडण्यास सुरुवात झाली तेव्हापासून नांदेड जिल्ह्यात कोरोनाने दररोज नवनवीन उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा वेग कमी असला तरी नागरिक मात्र मोठी दक्षता घेत होते. पण आता दररोज कोरोनाची संख्या वाढत असताना मात्र नागरिक बेफिकीर वागत आहेत. ना मुखपट्या वापरत आहेत ना सामाजिक अ़तराचे भान पाळत आहेत. नायगाव शहरात तर दररोज उच्च्यांकी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे नायगाव तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या ४००च्या जवळपास पोहोचली आहे. 

हेही वाचा  ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन- स्पर्धेचे व्हिडीओ १० सप्टेंबरपर्यंत पाठवावेत -

एक दुयम पोलीस अधिकारी आणि ५ पोलीस कर्मचारी पाँझिटिव्ह

ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असतांना गुरुवारी कोरोना कुंटूर पोलीस ठाण्यात पोहोचला. सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने खबरदार उपाय म्हणून कुंटूर पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यासह २५ पोलीस कर्मचाऱ्यांची अंटीजेन तपासणी करण्यात आली. यात ठाण्यातील एक दुयम पोलीस अधिकारी आणि ५ पोलीस कर्मचारी पाँझिटिव्ह आढळले. कुंटूर पोलीस एका अधिकाऱ्यासह पच पोलीस कर्मचारी पाँझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. बाधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर उपचार चालू असून कुणाचीही परिस्थिती गंभीर नाही त्यामुळे नागरिकांनीही कोरोना पासुन बचाव करण्यासाठी स्वतःची व आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी असे आवाहन कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Entry at Kuntur Police Station: One Officer Five Employees Positive nanded news