esakal | अबब ! नांदेड जिल्ह्यात वर्षभरात 1 लाख 89 हजार 565 जणांची कोरोना तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

५७८ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळाले असून सध्या जिल्ह्यात ३६४ जण बाधीत आहेत.

अबब ! नांदेड जिल्ह्यात वर्षभरात 1 लाख 89 हजार 565 जणांची कोरोना तपासणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागील एक वर्षापासून शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाने हैदोस घातला होता. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कसोससीने प्रयत्न केले. आरोग्य, पोलिस, महसुल आणि महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने कोरोनासारख्या संसर्गावर नियंत्रण मिळविता आले. जिल्ह्यात एक लाख ८९ हजार ५६५ जणांची कोरोना तपासणी घेण्यात आली. त्यापैकी २१ हजार ८१६ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ५७८ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळाले असून सध्या जिल्ह्यात ३६४ जण बाधीत आहेत.

शनिवार (ता. नऊ) ९०५ अहवालापैकी ८४५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २१ हजार ८१६ एवढी झाली असून यातील २० हजार ६७३ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३६४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शनिवार ता. नऊ जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील ६० वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा नांदेड ः बच्चेकंपनींनी यंदा सहल आणि गॅदरिंगला केले ‘मिस’

येथे घेत आहेत उपचार

बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड एक, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २५, खाजगी रुग्णालय पाच, माहूर तालुक्यांतर्गत एक, देगलूर कोविड रुग्णालय तीन असे एकूण ३५ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 
बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २३, मुखेड तालुक्यात एक, लोहा दोन, कंधार दोन, परभणी एक, नांदेड ग्रामीण एक, अर्धापूर तीन, हदगाव एक, अदिलाबाद एक असे एकुण ३५ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र तीन, मुखेड तालुक्यात एक, लोहा दोन, नांदेड ग्रामीण एक, बिलोली एक, भोकर एक असे एकुण नऊ बाधित आढळले.  

कोरोना मिटर

एकुण घेतलेले स्वॅब- १ लाख ८९ हजार ५६५
एकुण निगेटिव्ह स्वॅब- १ लाख ६३ हजार ६२०
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २१ हजार ८१६
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २० हजार ६७३
एकुण मृत्यू संख्या-५७८
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-३६४

नांदेडच्या ताज्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा