esakal | नांदेडला कोरोनाने सहा जणांचा मृत्यू ; दिवसभरात १५१ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या दोन महिला व तीन पुरुष यासह खासगी रुग्णायातील एक पुरुष अशा एकुण सहा जणांचा कोरोनाने शुक्रवारी (ता.२१) उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या १६८ वर पोहचली आहे. तर, दिवसभरात जिल्ह्यात १५१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

नांदेडला कोरोनाने सहा जणांचा मृत्यू ; दिवसभरात १५१ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या दोन महिला व तीन पुरुष यासह खासगी रुग्णायातील एक पुरुष अशा एकुण सहा जणांचा कोरोनाने शुक्रवारी (ता.२१) उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या १६८ वर पोहचली आहे. तर, दिवसभरात जिल्ह्यात १५१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात गुरुवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यू दरात कमी होत असल्याचे संकेत मिळत असतानाच शुक्रवारी उपचार सुरु असलेल्या वाजेगाव येथील महिला (वय ४१), कैलासनगर नांदेड महिला (वय ५८), कंधारमधील नवीन मोंढा पुरुष (वय ५६), चिखली (खुर्द) पुरुष (वय ६६), शक्तीनगर नांदेड पुरुष (वय ६८), गुरुद्वारा गेट नंबर चार बडपुरा नांदेड पुरुष (वय ५३) या सहा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूसंख्या १६८ वर पोहचली आहे. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; ११५ जण पाझिटिव्ह

शुक्रवारी ४४ कोरोना बाधितांची आजारावर मात 

शुक्रवारी (ता.२१) प्राप्त झालेल्या ८६१ स्वॅब अहवालापैकी ६३८ निगेटिव्ह तर, १५१ अहवाल पॉझिटिव्ह आले आत्तापर्यंत जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या चार हजार ८२१ इतकी झाली आहे. शुक्रवारी ४४ कोरोना बाधितांनी आजारावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन हजार ८४७ रुग्ण उपचारातून घरी परतले आहेत. 

हेही वाचा- सचखंड गुरुद्वारा बोर्ड : सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना फटकारले, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम​

तालुकानिहाय शुक्रवारी आढळलेले रुग्ण 

नांदेड शहर - ४५, नांदेड ग्रामीण - एक, अर्धापूर - तीन, हदगाव - सहा, कंधार - नऊ, मुखेड - २७, धर्माबाद - पाच, बिलोली - दोन, देगलूर - १७, मुदखेड - दोन, भोकर - एक, नायगाव - १२, लोहा - दोन, उमरी - १५, हिंगोली - तीन, लातूर - एक अशा एकूण १५१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५० हजार २२७ 
एकूण घेतलेले स्वॅब - ३३ हजार ३०३ 
एकूण निगेटिव्ह स्वॅब - २६ हजार ५३३ 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - चार हजार ८२१ 
आज शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण - १५१ 
आज शुक्रवारी मृत्यू - सहा 
एकूण मृत्यू - १६८ 
आज शुक्रवारी रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - ४४ 
आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - दोन हजार ८४७ 
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - एक हजार ७७१ 
सध्या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १३६ 
 

loading image
go to top