जिल्ह्यात कोरोनाचा लपंडाव सुरुच; गुरुवारी ४२ पॉझिटिव्ह, ३७ रुग्ण कोरोनामुक्त 

file Photo
file Photo

नांदेड - कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही काही ठिकाणी सुरू असून गुरुवारी (ता. ३१) नव्याने ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ३७ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दररोजच्या कमी जास्त होत असलेल्या संख्येमुळे जिल्ह्यात कोरोनाचा लपंडाव सुरु असल्याचे चित्र आहे. 

बुधवारी (ता. ३०) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या संशयीत रुग्णांच्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी (ता. ३१) एक हजार ८६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामधील एक हजार ३७ निगेटिव्ह आले तर ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ४७६ झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी गुरुवारी दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील ५७३ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

३७ रुग्ण कोरोनामुक्त 

गुरुवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील - दोन, महापालिकेतंर्गत गृहविलगीकरण - १९, जिल्हा शासकीय रुग्णालय - तीन, हदगाव - एक, बिलोली - एक, देगलूर - तीन, खासगी रुग्णालय - सात व हैदराबाद येथे संदर्भित एक असे ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दुसरीकडे नांदेड महापालिका क्षेत्रात - २८, नांदेड ग्रामीण - एक, देगलूर - एक, माहूर - सात, हदगाव- दोन, नायगाव -दोन, किनवट - एक असे ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

६३४ संशयित जणांच्या स्वॅबची  तपासणी सुरु

आतापर्यंत २० हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३२३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ११ रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी ६३४ संशयित जणांच्या स्वॅब अहवालाची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. शुक्रवारपर्यंत त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २१ हजार ४६७ 
एकुण बरे - २० हजार ३७० 
एकुण मृत्यू - ५७३ 
आज पॉझिटिव्ह - ४२ 
आज बरे - ३७ 
आज मृत्यू - शून्य 
उपचार सुरु - ३२३ 
गंभीर रुग्ण - ११ 
स्वॅब तपासणी सुरु - ६३४ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com