esakal | नांदेडमध्ये कोरोनाचे थैमान सुरुच: शुक्रवारी १५४ रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू, संख्या पोहचली १८३९ वर  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यातील आज ४१ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. हिंगोली गेट, मील गेट आणि तरोडा बु. येथील तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

नांदेडमध्ये कोरोनाचे थैमान सुरुच: शुक्रवारी १५४ रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू, संख्या पोहचली १८३९ वर  

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३१) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार १५४ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ४१ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. हिंगोली गेट, मील गेट आणि तरोडा बु. येथील तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ८१ एवढी झाली आहे. यात ७४ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण ७४६अहवालापैकी ४७१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता एक हजार ८३९ एवढी झाली आहे. यातील ८८७ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ८५९ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या ४१ बाधितांमध्ये डाॅ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, देगलुर कोवीड सेंटरमधून तीन, लोहा कोवीड सेंटरमधून तीन, पंजाब भवनमधून १३ आणि कंधार चार, खासगी रुग्णालय चार, मुखेड पाच, जिल्हा रुग्णालय दोन आणि बिलोली कोवीडमधून एकचा समावेश आहे.

हेही वाचा - या शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..?

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील देगाव चाळ एक, सराफा एक, तरोडा नांदेड एक, शारदानगर दोन, वसंतनगर दोन, वजिराबाद एक, लेबर काॅलनी एक, निर्मलनगर एक, दिलीपसिंग काॅलनी दोन, कलामंदीर एक, निवन मोंढा एक, यशनगरी एक, श्रीरामनगर एक, सुंदरनगर एक, काबरानगर एक, रामनगर सिडको तीन, व्ंयकटेश्वरानगर एक, व्यंकटेशनगर एक, आनंदनगर एक, भाग्यनगर चार, हैदरबाग तीन, मीलरोड एक, कौठा सहा, सिडको एक, पौर्णिमानगर एक, एमजीएम काॅलेज एक, आंबेडकरनगर एक, चौफाळा एक, जीएमसी विष्णुपूरी परिसर दोन, मीलगेट एक, सिध्दान्तनगर मालेगाव रोड एक, विष्णुपूरी दोन, नेहरुनगर तरोडा बु. एक, केळी मार्केट इतवारा एक, कृष्णानगर एक, साठेनगर एक, दत्तनगर एक, दुल्लेशहानगर एक, दीपनगर एक, गुरुनगर एक, मगनपूरा एक, गोविंद काॅम्पलेक्स परिसर एक, आखाडा बाळापूर एक, समिरा बाग एक, वसरणी एक, उदयनगर दोन, भालचंद्र नगर एक, देगलुर नाका एक, दुल्लेशाहनगर खडकपूरा एक, रहेमतनगर एक, वेदांतनगर एक, आनंदनगर दोन, हिंगोली नाका एक, कामठा एक, कासराळी तीन, इंदिरानगर बिलोली दोन, गंगास्थान पासी तीन, निझामाबाद चार, संघमित्र काॅलनी जंगमवाडी एक, येताळा धर्माबाद एक, कामठा अर्धापूर एक, बरकतपूरा अर्धापूर एक, नई आबादी अर्धापूर एक, जानापूरी लोहा एक, मिनकी बिलोली एक, बिलोली शहर एक, नायगाव रोड देगलुर एक, लाठकर गल्ली   देगलुर एक, मरखेल एक, गोविंदनगर देगलुर एक, तोट्टावार गल्ली देगलुर चार, सुगाव देगलुर एक, कोतेकल्लुर देगलूर तीन, शहापूर दोन, देशपांडेनगर देगलुर एक, गांधीनगर देगलुर एक, ग्रामिण रुग्णालय धर्माबाद एक, किनवट शहर एक, इस्लापूर ता. किनवट एक, मोमीनपूरा किनवट दोन, येसव्हीएम किनवट एक, बारुळ कंधार दोन, काल्सावाडी हदगाव एक, हदगाव शहर दोन, कानवटे हाॅस्पीटल लोहा एक, हेडगेवार चौक मुखेड एक, खरबखंडगाव मुखेड दोन, कारला मुखेड एक, दापका मुखेड दोन, वाल्मीनगर मुखेड दोन, कोळीगल्ली मुखेड एक, गायकवाड गल्ली मुखेड एक, जाहूर मुखेड दोन, कवटीकवार क्लिनिक मुखेड एक, नायगाव शहर एक, वसंतनगर ता. नायगाव दोन, घुंगराळा तीन, भायेगाव उमरी एक, खरबी उमरखेड एक, बाळापूर धर्माबाद एक, कुंठा गल्ली धर्माबाद एक, नामदेव मंदीर जवळ धर्माबाद एक, रुक्मिनीनगर धर्माबाद एक, बेलुर धर्माबाद दोन, रत्नाळी धर्माबाद एक, समराळा धर्माबाद एक, रसिकनगर धर्मबाद एक, सरस्वतीनगर धर्मबाद एक, बालाजीनगर धर्माबाद एक, देवीगल्ली धर्माबाद एक, गांधीनगर धर्माबाद एक, निझामबाद एक, इंदिरानगर धर्माबाद एक.

येथे क्लिक करादूध उत्पादकांच्या मदतीला भाजप शनिवारी रस्त्यावर उतरणार, काय आहेत मागण्या ?

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ८५९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १४५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २९२, नायगाव कोविड केअर सेंटर येथे २३, जिल्हा रुग्णालय येथे ३३, बिलोली कोविड केअर सेंटर येथे २०, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ९९, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ४६, उमरी १०, हदगाव कोविड केअर सेंटर २५, किनवट कोविड केअर सेंटर येथे दहा, लोहा कोविड केअर सेंटर येथे एक, कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, भोकर तीन, कंधार ११, धर्माबाद ३३, खाजगी रुग्णालयात १०९ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित चार, निझामाबाद एक, हैद्राबाद दोन आणि मुंबई दोन आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४९ हजार ३०५
घेतलेले स्वॅब- १४ हजार ३०
निगेटिव्ह स्वॅब- ११ हजार ३४७
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १५४
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १८३९
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-२
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-२८
मृत्यू संख्या- ८१
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ८८७
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ८५९
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३४२