esakal | कोरोना : सेलूच्या ‘त्या’ महिलेचा नांदेडातच दफनविधी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व संशयितांना शासकीय रुग्णालयात अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले असून, यामध्ये महिलेच्या दोन मुलांचा देखील समावेश आहे. त्यामुळे स्वतःच्या आईच्या दफनविधीलाही त्यांना जाता आले नाही.  

कोरोना : सेलूच्या ‘त्या’ महिलेचा नांदेडातच दफनविधी

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : सेलू (जि. परभणी) येथील एका कोरोना बाधीत महिलेचा गुरुवारी (ता. ३० एप्रिल) रोजी रात्री १० वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिच्यावर नांदेड येथील ईदगाह कब्रस्तान येथे केवळ पाच जणांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला.  

सुरुवातीस कोरोना बाधित महिलेचा दफनविधी नेमका कुठे आणि कसा करायचा? याबद्दल अनेक मत-मतांतरे तयार होत होते. परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच कोरोना बाधित रुग्णावर दफन विधी अथवा अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या निर्देशांचे पूर्णपणे पालन व्हावे, म्हणून हा दफनविधी नांदेड येथेच करण्यात आला आहे. यासाठी महापालिकेचे कर्मचारी व स्थानिक मुस्लीम बांधवांनी सहकार्य केले.

हेही वाचा धक्कादायक :  नांदेडमध्ये बाधीतांची संख्या गेली सहावर,  दोघांचा मृत्यू

गुरुवारी (ता.३० एप्रिल)  विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तीन कोरोना बाधित रुग्णावर उपचार उपचार सुरू होते.  यातील 22 एप्रिल रोजी बाधित झालेल्या पहिल्या रुग्णाची गुरुवारी (ता.३० एप्रिल) दुपारी दीड वाजता तर रात्री साडेदहा वाजता सेलू येथील कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला. दोघांवरही नांदेड येथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला आहे. 

‘त्या’ पॉझिटिव्ह चार रुग्णांची प्रकृती स्थीर  
अबचलनगर येथील एका रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवारी (ता.२६ एप्रिल) प्राप्त झाला होता.  त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील १८  व्यक्तींच्या स्वँबचा अहवाल निगेटीव्ह आहे. श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे दोन  वाहनचालक आणि त्यांचा एक मदतनीस यांचाही स्वँब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरु आहेत. सध्या चारही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  त्यांच्या संपर्कातील १३ जणांना यात्री निवास तसेच कोविड केयर सेंटर किवळा (ता.लोहा)येथे ठेवण्यात आले आहे. त्यांची स्वॅब तपासणीसाठी पाठविल्याचे डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  

आजपर्यंतची परिस्थिती 

 • संशयित - १२०३ 
 • क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- १०३६
 • क्वारंटाईन कालावधी पूर्ण -  ३४२
 • निरीक्षणाखाली असलेले - १६७
 • पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - ११६
 • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -९२०
 • आज तपासणीसाठी नमुने घेतले- १०३
 • एकुण नमुने तपासणी- १०८८
 • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ६
 • पैकी निगेटीव्ह -९६९
 • नमुने तपासणी अहवाल बाकी-१०३
 • नाकारण्यात आलेले नमुने - ५  
 • अनिर्णित अहवाल – ४
 • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – २
 • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ८४,०२३ असून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे.