बाबो...तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनाच कोरोना

test-kits-2.jpg
test-kits-2.jpg

कंधार, (जि. नांदेड) ः तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. आता कोरोनाने अँटीजेन टेस्ट तपासणी पथकात प्रवेश केला असून गुरुवारी (ता.१३) या पथकातील सातजणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. या खळबळजनक घटनेनंतर तालुका आरोग्य विभागाला सील मारण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात तीन अँटीजेन टेस्ट पथकाद्वारे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना तपासणीचे काम चालू आहे. या पथकातील प्रमुख कर्मचाऱ्यासह कुटुंबातील चार सदस्यांचे रिपोर्ट (ता.१३) ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. जिल्ह्यासह राज्यात व देशात कोरोनाच्या विषाणूने रौद्ररूप धारण केले आहे. बाधितांबरोबर मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे हे खरे कोरोना योद्धा आहेत.


कुटुंबातील सदस्यांची तपासणी
तालुक्यात तीन पथकाद्वारे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना अँटीजेन टेस्ट किटने तपासणी केली जात आहे. या पथकातील प्रमुख कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील चार सदस्यांचा रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने तालुका आरोग्य विभाग सील करण्यात आले आहे. या आरोग्य विभागातील काम करणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


नातेवाइकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
तालुक्यातील इमामवाडी, कुरुळा, औराळ व गुट्टेवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या ४३ नातेवाइकांची गुरुवारी अँटीजेन टेस्ट किटने तपासणी केली. यात सात नातेवाइकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील गुट्टेवाडी ः २८ वर्षीय पुरुष, कुरुळा ः ३५ वर्षीय पुरुष, औराळ ः २५ वर्षीय पुरुष याबरोबर सात कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. अँटीजेन टेस्ट किटने आतापर्यंत ५७० बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी करण्यात आली असता २५ रुग्ण कोरोनाबाधित निघाले अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


असे सुरू आहेत उपचार
फुलवळ, उस्माननगर, मोहिजा, परांडा, चिखलभोसी, इमामवाडी, सोनमाळतांडा, काटकळंबा, मानसपुरी, बारूळ, दिग्रस (बु), शिराढोण तांडा, पानभोसी, नंदनवन, तळ्याचीवाडी, चोळीतांडा, नवघरवाडी, महालिंगी, गाऊळ, शिर्शी (खु), कुरुळा, औराळ, गुट्टेवाडी या गावांत ७६ तर कंधार शहरात ३९ असे गुरुवारपर्यंत एकूण ११५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नऊजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६१ रुग्णांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. कंधार कोविड केअर सेंटरमध्ये १४ रुग्णावर उपचार चालू आहेत. उर्वरित बाधित रुग्णावर शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचार चालू आहेत.

संपादन - स्वप्निल गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com