कोरोना : नांदेड महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी असुरक्षीत, विना सुरक्षेशिवाय राबतायत हात

प्रल्हाद कांबळे
Saturday, 8 August 2020

स्वचछता कर्मंचारीच असुरीक्षीत असून त्यांच्याकडे महापालिका किंवा नगरपरिषद प्रशासनाला वेळ नसल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कुटुंबीय भयभीत झाले आहेत. 

नांदेड : शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिका आणि नगरपरिषद प्रशासनाला काम करावे लागते. शहरात घाण पसरुन साथीचे आजार पसरु नये म्हणून विशेष निधीतून स्वच्छता विभागावर खर्च केल्या जातो. शहरातील नाल्या, रस्ते आणि मलनिस्सारण साफ करण्याचे काम सफाई कामगार करतात. घाणीच्या दुरुनही गेले तरी नाकाला अनेकजण कापड लावतात. परंतु या घाणीचा सामना करणारे सफाई कामगार कोरोनासारख्या महाभंयकर आजारात विना सुरक्षा कीट शिवाय स्वच्छतेचे काम करत आहेत. स्वचछता कर्मंचारीच असुरीक्षीत असून त्यांच्याकडे महापालिका किंवा नगरपरिषद प्रशासनाला वेळ नसल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कुटुंबीय भयभीत झाले आहेत. 

नांदेड शहरात महापालिका तर तालुका स्तरावर नगरपरिषदेअंतर्गत शहरात स्वच्छता ठेवल्या जाते. त्यासाठी हे काम कंत्राटदारांना देऊन महापालिका नामानिराळी होत आहे. शहरात जागोजागी नाल्या व ड्रेनेज तुंबून घाण पाणी रस्त्यावर नव्हे तर अनेक भागात नागरी वसाहतीत शिरते. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता असते. शहरातील नाल्या सपाई कामगारांच्या मार्फत साफ केल्या जातात. परंतु मागील चार महिण्यापासून नाली सफाईचे काम बंद झाले की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेचे सफाई कर्मचारी फक्त रस्ते साफ करताना दिसुन येत आहेत. काही भागत आजही घंटागाडी जात नाही. त्यामुळे अनेक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे.

हेही वाचा - गणेशोत्सवात स्वयंशिस्तीला प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

शासकिय व नागरी वसाहतीत कचऱ्याचे ढीग

सध्या पावसाळा सुरु असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत आहे. शहरात फॉगींग मशीनद्वारे फवारणी बंद आहे. तसेच रस्ते व नाली सफाई वेळेमध्ये होत नसल्याने घाण रस्त्यावर जमा होत आहे. त्याचा परिणाम असा झाला की साथीचे आजार वाढले. शहराचे मुख्य रस्ते साफ करायचे व अंतर्गत रस्त्याकडे पाहायचे नाही हा दुटप्पा येथील कंत्राटदारांच्या कामातून दिसुन येत असल्याचा आरोप होत आहे. अनेक शासकिय व नागरी वसाहतीत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्थानिक नगरसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. शहराच्या अनेक भागात नागरिकांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. त्यांना पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागतो. नको तिथे खर्च करुन महापालिका आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. 

 सफाई कामगार प्रामाणीकपणणे आपले शहर समजून स्वच्छ करतत

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फ्रन्ट लाईनवर लढणारे कोरोना यौध्ये म्हणून सफाई कामगारांकडे पाहिल्या जाते. त्यांच्याकडून संबंधीत कंत्राटदार अतिरिक्त काम करुन घेत असले तरी त्या कर्मचाऱ्यांना कुठलीच सुरक्षा नाही. महापालिकेच्या कंत्राटानुसार कामगाराना काय सुविधा द्यावी हे सर्व नियमावली ठरविलेली असताना कंत्राटदार किंवा महापालिका प्रशासन मुग गीळून गप्प दिसते. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे कीट देण्यात आले नसल्याने विना सुरक्षा कीट सफाई कामगार प्रामाणीकपणणे आपले शहर समजून स्वच्छ करत आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने आणि संबंधीत यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सफाई कर्मचाऱ्यांच्या या समस्यकडे लक्ष घालून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Unsafe cleaning staff working without security nanded news