esakal | Corona Update : नांदेड जिल्ह्यात आज पाच पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण १४३
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनेक नागरिक काळजी घेत नसल्यानेच इतवारा भागात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे इतवारा भागासह लोहार गल्ली, करबला नगर व कुंभार टेकडी या भागातील नागरिकांनी दक्ष रहावे.

Corona Update : नांदेड जिल्ह्यात आज पाच पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण १४३

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड :  दोन दिवसांपासून जिल्ह्यात केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. तर दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत असतानाच शुक्रवारी (ता.२९ मे) पुन्हा पाच नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या १४३ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी सांगीतले. 

बुधवारी (ता.२७ मे) पाठवलेले ७३ स्वब रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील अशी माहिती डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली होती. तर दुसरीकडे १९२ अहवाल तपासणीचे काम सुरू होते. त्यामुळे या अहवालाकडे जिल्हा प्रशासनासह सर्वांचेच लक्ष लागले होते. बुधवारी आणि गुरुवारी पाठवलेल्या एकूण स्वॅब आहवालांपैकी शुक्रवारी (ता.२९ मे) १०४ अहवाल प्राप्त झाले.  यातील ९७ अहवाल निगेटिव्ह, दोन अहवाल अनिर्णित तर पाच आहवाल पॉझिटिह आले आहेत. नव्याने सापडलेल्या पाच पॉझिटिव रुग्णांमध्ये एका महिलेचा तर चार पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा - Video -  मधुमेहींनी कोरोनापासून अशी घ्यावी काळजी - डॉ. संतोष मालपाणी
 

यामध्ये मित्तल नगर भागातील ३२ वर्षीय व्यक्तीचा तर लोहार गल्लीतील २८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तसेच मुखेड तालुक्यातील ४० वर्षीय महिलेचाही त्यात समावेश आहे. यासह २५ रुग्ण हे हिंगोली जिल्ह्यातील असून त्यांच्यावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन रुग्ण हे हिंगोली जिल्ह्यातील आहेत.

नांदेड @ कोरोना मीटर
* पॉझिटिव्ह : १४३
* डिस्चार्ज : ९०
* मृत्यू: ७
* उपचार सुरू: ४५ (२ मुंबईत)
 
विशेष म्हणजे गुरुवारी (ता.२८) सापडलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा लोहार गल्लीतील होता, त्यामुळे लोहार गल्लीत अजून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. करबला नगर आणि कुंभार टेकडी परिसरा बरोबरच आता लोहार गल्ली येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. 

कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षा घेऊन नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. अनेक नागरिक काळजी घेत नसल्यानेच इतवारा भागात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे इतवारा भागासह लोहार गल्ली, करबला नगर व कुंभार टेकडी या भागातील नागरिकांनी दक्ष रहावे.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड

loading image
go to top