Corona Update : सोमवारी नांदेडकरांना काहिसा दिलासा

प्रमोद चौधरी
Monday, 17 August 2020

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये १८४ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. 

नांदेड :  जिल्ह्यात नांदेडकरांना काहिसा दिलासा असून, सोमवारी (ता.१७) दिवसभरात ६३ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. तर ८१ रुग्णांची भर पडली आहे. दोघांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निळकंठ भोसीकर यांनी कळवले आहे.

सोमवारी सायंकाळी ४३६ अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये ३४४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आरटीपीसीआरद्वारे ४३ तर अॅटीजेन रॅपिड टेस्टद्वारे ३८ असे एकूण ८१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तर उपचार सुरु असताना सरपंचनगर नांदेड येथील ७० वर्षिय महिलेचा खासगी रुग्णालयात तर गोरठा (ता.उमरी) येथील ५५ वर्षिय महिलेचा विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १८४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही डॉ. भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचा - जोरदार पावसाने पर्यायी पूलच गेला वाहून

नांदेड जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागातही पोचल्याने नांदेड शहरापेक्षा ग्रामीणमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे महिलांचाही यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. तरीही नागरिक ऐकायला तयार नाहीत. परिणामी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

हे देखील वाचाच - मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची परवड, कशी? ते वाचाच

नांदेड कोरोना मीटर 

 • एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५० हजार ५१६ 
 • एकूण घेतलेले स्वॅब - ३० हजार २१७ 
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - २४ हजार ०३६ 
 • एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण - चार हजार १८७ 
 • सोमवारी सापडलेले पाॅझिटिव्ह रुग्ण - ८१ 
 • एकूण मृत्यू - १४९ 
 • सोमवारचे मृत्यू - दोन 
 • एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - दोन हजार ४७७ 
 • सोमवारी सुटी दिलेले रुग्ण - ६३ 
 • रुग्णालयात उपचार सुरु असलेले रुग्ण - एक हजार ५३४ 
 • सोमवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ४४३ 
 • सोमवारी गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १८४ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Some Relief To Nandedkar On Monday