esakal | कोरोना व्हायरस : पायोनियर कंपनीत एका अधिकाऱ्यांकडून २० जण बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या अर्धा शतकाकडे म्हणजे ४८ वर गेली आहे. कंपनीतील अधिकारी व कर्मचारी असे एकूण ६७० जणांची तपासणी तीन दिवसात पूर्ण झाली आहे.

कोरोना व्हायरस : पायोनियर कंपनीत एका अधिकाऱ्यांकडून २० जण बाधित

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद (जिल्हा नांदेड) : धर्माबादेतील बाळापूर शिवारात असलेल्या पायोनियर डिस्टलिरीज कंपनीत कोरोनाचा सिलसिला सुरूच असून कोरोनाग्रस्त  एका अधिकाऱ्याकडून कंपनीतील एकूण २० जण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या अर्धा शतकाकडे म्हणजे ४८ वर गेली आहे. कंपनीतील अधिकारी व कर्मचारी असे एकूण ६७० जणांची तपासणी तीन दिवसात पूर्ण झाली आहे. शासनाला दरमहा ४० कोटी रुपये महसूल देणारी पायोनीअर कंपणी कोरोनामुळे दहा दिवसांसाठी युनिट बंद करण्यात आले आहे.

येथील बहुचर्चित पायोनियर डिस्टलिरीज कंपनीतील एका अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यामुळे कंपनीतील अधिकारी कर्मचारी, व कामगारांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरील घटनेची दखल तहसिलदार दत्तात्रय शिंदे यांनी घेऊन कंपनीत आरोग्य यंत्रणेनेसह बुधवारी दुपारी दाखल झाले. बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व सर्व कामगार आदी ६७० जणांचे ॲन्टीजेन किटने कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. यात कंपनीतील मोठ्या एका अधिकाऱ्यांसह १९ कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच कंपनीतील सर्व भागात जंतूनाशक फवारणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. 

कंपनीतील ६५० जण होम कोरंटाईन 

६७० जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एका अधिकाऱ्यांसह १९ जण बाधित आढळले. तसेच ६५० जणांना होम क्कारंटाईल करण्यात आले आहे. कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या परीवाराची कोरोना तपासणी शुक्रवारी केल्यानंतर तीन जण कोरोना बाधीत आढळून आल्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या धर्माबादेत मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच येथील कोवीड केअर सेंटर मार्फत शुक्रवारी १७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४८ वर गेली आहे.

हेही वाचा -  नांदेडमध्ये कोरोनाचे थैमान सुरुच: शुक्रवारी १५४ रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू, संख्या पोहचली १८३९ वर

शहरात ११ ठिकाणी कंटेनमेन झोन 

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून धर्माबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शहरातील बालाजी नगर येथील एका परिवारात जवळपास दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे धर्माबादकर अगोदरच हादरले होते. त्यातच नांदेड जिल्ह्यातील एकमेव सुरू असलेली धर्माबाद येथील पायोनीअर कंपनीत कोरोनाने जबरदस्त एन्ट्री केल्याने धर्माबादकरांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. आजपर्यंत तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या अर्धा शतकाकडे म्हणजे ४८ वर गेली आहे. त्यामुळे शहरात ११ ठिकाणी कंटेनमेन झोन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज

आजपर्यंत तालुक्यात ४८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ११ व्यक्तींनी कोरोनाला हरविले आहेत. तर ३७ कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरू आहे. कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दत्तात्रय शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे, गटविकास अधिकारी श्रीकांत बेळदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कांबळे, डॉ. वेणूगोपाल पंडीत, डॉ. पुजा आरटवार, डॉ. नागरगोजे, डॉ. प्रदीप म्याकलवार, नगरपरीषदेचे कार्यालयीन अधीक्षक बाबूराव केंद्रे, रूक्माजी भोगावार, सफाई विभाग प्रमुख अशोक घाटे, मंडळ अधिकारी नामदेव माळोदे, तलाठी सहदेव बासरे यांच्यासह आरोग्य विभाग व नगरपरीषदेचे सर्व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
 

संपादन-  प्रल्हाद कांबळे