नांदेड पोलीस दलातील कोरोनाचा पहिला बळी

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा फैलाव जोमाने सुरु असून आज घडीला सात हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली   आहे. त्यात सर्वच विभागातील व सर्वसामान्य नागरिकांसह कोरोनानै हैराण करुन सोडले आहे. यातच नांदेड पोलीस दलातील एका पोलिस हवालदाराला आपला जीव गमवावा लागला. बालाजी तुकाराम ढगे असे त्यांचे नाव असून मंगळवारी (ता. एक) सप्टेंबर रोजी शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात तळागाळापर्यंत पसरली आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. जिल्ह्यातील अनेकांचा या कोरोनामुळे बळी गेला आहे. दोन दिवसापूर्वी खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनाच कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या    सहकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली असून ते वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

फ्रन्टलाइनवर लढणाऱ्या या कोरोना यौध्यांनाही कोरोनाने सोडले नाही

पोलीस विभागातील कोरोनाविरुद्धात फ्रन्टलाइनवर लढणाऱ्या या कोरोना यौध्यांनाही कोरोनाने सोडले नाही. यापूर्वी पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, फौजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्यांनी यावर मात करत पुन्हा नव्याने सेवा सुरु केली आहे. मात्र जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले बालाजी तुकाराम ढगे (बक्कल नंबर 1989) राहणार घुंगराळा तालुका नायगाव यांना मात्र कोरोनावर मात करता आली नाही. 

ढगे कुटुंबियावर काळाने घातला मोठा घाला 

ता. 31 ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ते रुग्णालयात भरती झाले. त्यांचा अहवाल    कोरोना पॉझिटिव आला. यातच त्यांची प्रकृती खालवत गेली आणि दुर्दैवान मंगळवारी एक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. नांदेड पोलीस दलातील हा पहिला बळी ठरला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी यापुर्वी मुखेड, स्थानिक गुन्हा शाखा, पोलीस मुख्यालय, जिल्हा विशेष    शाखेमध्ये काम केलेले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच घुंगराळा तालुका नायगाव येथे त्यांच्या निधनाबद्दल शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सासऱ्याचे तीन दिवसापूर्वीच निधन झाले होते. तिसऱ्याच दिवशी हा ढगे कुटुंबियावर काळाने मोठा घाला घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com