Crime News : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी कारवाया; साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त, १०७ आरोपींवर कारवाई

Nanded Police : नांदेड परिक्षेत्रात ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान-१’ अंतर्गत तिसऱ्या आठवड्यात ३७३ कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये सुमारे साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि १०७ आरोपींवर कारवाई झाली.
Crime News
Crime NewsSakal
Updated on

नांदेड : महाराष्ट्र दिनापासून नांदेड परिक्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान-१ अंतर्गत १५ मे ते २१ मे २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यांत एकूण ३७३ कारवाया करत ४६७ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवायांदरम्यान पोलिसांनी एकूण चार कोटी ४८ लाख ६० हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com