नांदेड : बोटावर मोजण्या इतक्याच स्मशानभूमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crematorium

नांदेड : बोटावर मोजण्या इतक्याच स्मशानभूमी

उमरी - जिवनात अंत्यसंस्काराला महत्व असून मृत व्यक्तीला सन्मानाने निरोप दिला तर कुठेतरी आत्माला शांती मिळते असे म्हटले जाते. त्यासाठी गाव तेथे स्मशानभूमी असायला पाहिजे, पण उमरी तालुक्यातील अनेक गावात स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. स्वातंत्र मिळून ७४ वर्षे उलटली तरी ग्रामीण भागात मरणानंतरही जागा मिळत नसल्याने आजही अंत्यसंस्कार कोणाच्या मालकीच्या शेतात तर कुठे नाला, नदीच्या काठेला केले जातात. परंतु आजही अनेक गावे स्मशानभूमीच्या जागेसाठी गावे प्रतिक्षेत आहेत. स्मशानभूमीचा प्रश्न प्रत्येक गावातील जातनिहाय महत्त्वाचा असतो. काही बोटावर मोजण्या इतक्या गावांमध्ये स्मशानभूमी आहेत, मात्र त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असून त्या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव आहे. उमरी तालुक्यात एकूण ६३ गावे असून ५८ ग्रामपंचायती आहेत.

गाव तेथे स्मशानभूमी असणे महत्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सार्वजनिक स्मशानभुमीसाठी जागा तर सोडा सातबारावर स्मशानभुमीची म्हणून सुध्दा नोंद नाही. तालुक्यातील गावात गोरठा, तळेगाव, गोळेगाव, धानोरा, मनुर, शिंधी, ढोल उमरी, नागठाणा बुद्रुक, नागठाणा खुर्द, राखडक, मोखंडी, सावरगाव कला, सावरगाव दक्षिण, अस्वलदरी, हुंडा, शेलगाव, जामगाव, हस्सा, येंडाळा, महाटी/कौडगाव, बळेगाव, हातनी, बोथी तुराटी, बोरजुन्नी, निमटेक या गावात पारंपारिक पद्धतीने आजपर्यंत वडिलोपार्जीत ज्यांच्या त्यांच्या खासगी जागेत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात.

अठरा गावांना स्मशानभूमी

उमरी तालुक्यातील एकूण ६३ गावांपैकी बोटावर मोजन्या इतकेच गावात स्मशानभुमीची सातबारावर नोंद आहे. तरीही सार्वजनिक स्मशानभूमी म्हणून २६ गावात स्मशानभुमीचे शेड बांधण्यात आलेले नाहीत. शेड नसल्याने अनेक अडचणी येतात. पावसाळ्यात गोदावरी काठावरील या गावांना याचा नाहक त्रास होतो.

Web Title: Crematorium To Eighteen Villages In Umri Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedUmariCrematorium
go to top