नांदेड येथे जिन्मॅस्टिकच्या क्लासमध्ये मुलीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Girl molested gymnastics class in Nanded

नांदेड येथे जिन्मॅस्टिकच्या क्लासमध्ये मुलीचा विनयभंग

नांदेड : जिन्मॅस्टिक क्लाससाठी आलेल्या एका पंधरा वर्षीय मुलीला कपडे बदलताना पाहून तिच्याशी जवळीक करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील एका खासगी शाळेजवळ जिन्मॅस्टिक असोसिएशन क्लास क्रीडा प्रशिक्षक जयपाल रेड्डी (वय ४०) हा चालवतो. त्याच्याकडे विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रशिक्षण घेतात. त्यापैकी एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी त्याने जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. गेल्या २८ डिसेंबर २०२१ पासून ते १९ सष्टेंबर २०२२ पर्यंत त्याने तिला त्रास दिला. समाजात बदनामी होईल, या भीतीने ती हा प्रकार सहन करत होती.

मात्र, त्रास वाढल्यामुळे तिने नातेवाईकांना प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक डॉ. नितीश काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला फौजदार ए. एस. पवार यांनी तपास केला आणि आरोपीला अटक केली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. नितीश काशीकर यांनी दिली.

Web Title: Crime News Girl Molested Gymnastics Class In Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..