गुपचूप उरकला अंत्यविधी; काय आहे भानगड वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020


तामसा रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीमध्ये मंगळवारी (ता.सात) रोजी सकाळी आठच्या सुमारास फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवता, मास्क न लावता तसेच कुठलीही परवानगी न घेता गर्दी केल्याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. येथील नगरपरिषद प्रशासनाने याबाबतची दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याबाबत उल्लंघन केल्याबाबत अंत्यविधीस गर्दी केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे यानिमित्ताने बोलल्या जात आहे.

हदगाव, (जि. नांदेड) ः येथील तामसा रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीमध्ये मंगळवारी (ता.सात) रोजी सकाळी आठच्या सुमारास फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवता, मास्क न लावता तसेच कुठलीही परवानगी न घेता गर्दी केल्याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. येथील नगरपरिषद प्रशासनाने याबाबतची दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याबाबत उल्लंघन केल्याबाबत अंत्यविधीस गर्दी केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे यानिमित्ताने बोलल्या जात आहे.

शासन आदेशाचे उल्लंघन
येथील प्रकाश कुंजीलाल राठोड (वय ४०) यांच्या अंत्यविधीकरिता मंगळवारी (ता.सात) रोजी सकाळी त्यांच्या नातेवाइकांनी प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता गर्दी केली होती. त्यानुषंगाने मृत प्रकाश यांचे वडील कुंजीलाल राठोड व त्यांच्या सोबतच्या इतर लोकांविरुद्ध कोरोना विषाणू व प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या शासन आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणची व्यक्तिगत सुरक्षा व लोकांची सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य शहरातील हिंदू स्मशानभूमी येथे व्हिडिओद्वारे निदर्शनास आले. 

हेही वाचा -  नांदेड परिमंडळातील वीजग्राहकांनी ‘एवढ्या’ लाखांचा केला भरणा -

संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद 
कुंजीलाल राठोड व त्यांच्यासोबतच्या इतर लोकांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात यावा अशी फिर्याद पालिकेचे नगररचना सहायक शिवम घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सय्यद अहमद मोहसीन जाफरी हे करत आहेत. अंत्यविधीस विनापरवानगी लोक जमा झाल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद झाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. कायद्याचा बडगा व प्रशासनाची शिस्त सर्वांना कळावी याबाबत येथील उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी या गुन्ह्याबाबत नगरपरिषद प्रशासनास सूचना केल्यानंतर मुख्याधिकारी विजय येरावाड यांनी पुढाकार घेतल्याचेही यानिमित्ताने बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes Against Relatives For Attending Funerals, Nanded News