बँड, बाजा, बारात अन् लॉकडाऊन

download.jpg
download.jpg


नायगाव, (जि. नांदेड) ः बाशिंगबळ असतांनाही यंदा लॉकडाउनमुळे अनेकांना बोहल्यावर चढता आले नाही. त्यामुळे कित्येकांनी लग्न पुढे ढकलले आहे. तर काहींनी दोन कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत साधेपणाने बार उडविला. यामुळे बँड, बाज्या, डिजे व मंगल कार्यालयांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून बँडवाल्यांसह अनेकांवर तर उपासमारीचे संकट कोसळले आहे. यंदा कोरोनामुळे बँड, बाजा व बारातही लाँकडाउन झाल्याने लग्नाळूंचा मोठा हिरमोड झाला आहे.

मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदा लग्न सराई जोरदार होणार होती. मुलगी व मुलगा पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर सोयरिक करून दोन्ही कुटुंबांतील सदस्यांच्या सहमतीने लग्नाचे बेत ठरवण्याबरोबरच तारखाही निश्चित केल्या. घरातील ज्येष्ठ मंडळींनी मंगल कार्यालय बुक करण्याबरोबरच बँड, बाजेवाल्यांना सुद्धा लग्नाची सुपारी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी गुलाबी स्वप्ने रंगवत असतांना लग्नात कोरोणाचे विघ्न निर्माण झाले आहे. देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता टाळेबंदी लागू केली. विवाह सोहळ्यासह, सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली. कारण आजकाल मोठ्या थाटामाटात आपल्या पाल्याचे लग्न करण्याची प्रथा पडली आहे. असे लग्न सोहळे कोरोनाचे वाहक ठरण्याची शक्यता असल्याने लग्न सोहळ्यावरच बंदी आली. या बंदीने लग्नाळूंचा तर हिरमोड केलाच; पण एका विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेल्या अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.


कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता
नायगाव व नरसी परिसरात लहान - मोठे असे एकूण दहा मंगल कार्यालये आहेत. मंगल कार्यालयचालकांनी तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्न सराईची सुरवात होते. हा अंदाज बांधून आपापल्या मंगल कार्यालयाची स्वच्छता व साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीची कामे करून मंगल कार्यालये सज्ज ठेवली असतांनाच मार्च महिन्यात कोरोनाचे विघ्न आले. सुरवातीला कुणीही गांभीर्याने घेतले नसल्याने देशात व राज्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शासनाने लॉकडाउन करून कडक बंधने घातली. त्यामुळे मंगल कार्यालयांत होणाऱ्या लग्न सोहळ्यावरही बंदी आली. अनेकांनी केलेले बुकिंग रद्द झाले. परिणामी मंगल कार्यालयचालकांना घेतलेले अडव्हान्सही परत द्यावे लागले.

लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या
शासनाच्या कडक धोरणामुळे लग्नाच्या तारखा काढून तयारी केलेलेही वधू-वर कुटुंबातील मंडळी धास्तावली आता काय करायच. पण काहीजण मुलांच्या आग्रहाखातर दोन कुटुंबांतील मोजक्या सदस्यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत अतिशय साधेपणाने लग्न केले, तर असंख्य तरुणांनी लग्नाचा बेत पुढ ढकलला. मनात इच्छा नसतांना तरुणाईला आपल्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्याने बाशिंगबळ असतांनाही कोरोनामुळे बोहल्यावर चढता आले नसल्याची खंत व्यक्त करतांना दिसून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com