नांदेड : वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरे पडून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले

नांदेड : वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान

तामसा - हदगाव तालुक्यातील तामसा व परिसरात बुधवारी (ता. चार) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अर्धा तास मुसळधार अवकाळी पावसाने हाहाकार माजविला. अचानक झालेल्या वादळी वारा व पावसाच्या तडाख्याने शहर व परिसरात घराचे तसेच शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याने परिसरातील झाडाच्या फांद्या पडल्या असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून कोसळली आहेत. येथील शेतकरी बालाजी व कैलास लगडूतकर यांच्या शेतातील रेशीम उद्योगाचा शेड वादळाच्या तडाख्यात भुईसपाट झाला असून लगडुतकर बंधूची अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेडमधील अंदाजे दोन लक्ष रुपयांचे रेशीम बीज नष्ट झाले आहे. येथील शेतकरी ललिता काशिनाथ खुपसे यांच्या शेतातील घर पडले असून पत्रे गायब झाली आहेत. खुपसे यांच्या घरातील संसारोपयोगी भांडे, धान्य भिजले, फुटले असून दोन कपाटे पडून नुकसान होत घर उघड्यावर आले आहे.

किशोर अग्रवाल यांच्या घरावरील रूम वादळाने कोसळून नुकसान झाले असून होळी गल्ली येथील लाभसेटवार कुटुंबाच्या घरावरील जुने छत वादळाने पडले आहे. शहरातील अनेकांचे घरावरील पत्रे उडून जाणे, पत्रांची घरे पडणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने सायंकाळी वीजपुरवठा खंडीत झाला होता. मध्यरात्री एक वाजता महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पी. पी. साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रचालक सतीश सोनसळे व पथकाने मेहनत घेऊन वीज पुरवठा सुरळीत केला. अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक संकटामुळे शहरवासियांची धांदल उडाली होती. नुकसान झालेल्यांना शासनाने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Damage To Rain With Stormy Winds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top