
वाई बाजार (जिल्हा नांदेड) : जीवघेण्या डॉल्फिन गेम नंतर आता पब्जी ऑनलाईन गेमचे शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागातही फॅड वाढले आहे. मोबाईलवर पब्जी नावाचा गेम खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पार्डी (ता. माहूर) शनिवारी (ता. २५) येथे घडली आहे. मयत तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करताना 'पब्जी' सारख्या घातक गेमवर शासनाने बंदी घालावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
माहूर तालुक्यातील मछींद्र पार्डी येथील तरुण राजेश नंदू राठोड ( वय १८ ) हा शनिवारी (ता. २५)जुलै रोजी आपल्या घराशेजारीच मोबाईलवर पब्जी गेम खेळत बसला होता. त्यावेळी वडील व घरातील इतर मंडळी आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असल्याने राजेशकडे कुणाचे लक्ष नव्हते. राजेश हा गेम खेळताना अचानक कधी गतप्राण झाला हे कुणाच्याही लक्षात आले नाही. दरम्यान,राजेश हा कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याचे त्याच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा कोल्याने शेजारी धावले. गेम खेळताना डिप्रेशनमध्ये गेल्याने हृदयविकाराचा धक्का आला असावा त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात आली आहे. तर मयत राजेशची अवस्था पाहता ऐन 'नागपंचमी'च्या दिवशी घडलेल्या या अनपेक्षीत घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शोकाकूल वातावरणात राजेशच्या पार्थिवावर म. पार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉल्फिन गेमवरील बंदीच्या धर्तीवर शासनाने पब्जीवर देखील तातडीने बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
नेटवर्क नसल्याने झाडावर बसून खेळायचा पब्जी.
राजेश हा तरुण पब्जीच्या एवढ्या आहारी गेला होता की, येथे मोबाईल नेटवर्क कमजोर असल्याने पुरेसे नेटवर्क मिळविण्यासाठी राजेश हा कधी कधी झाडावर बसून देखील पब्जी गेम खेळताना त्याला अनेकांनी पाहिले होते.
रॉयल पास मिळविण्याच्या नादात युवक कवटाळत आहेत मृत्यूला.
पब्जी खेळत रॉयल पास म्हणून एक सबस्क्रीप्शन आहे. ज्याच्या माध्यमातून अत्याधुनिक लढाई, साहित्य, वेशभूषा इत्यादी नवीन पद्धतीच्या स्किन उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची किंमत ८५० रुपये इतके ऑनलाइन भरावी लागते. पश्चात ईक्युपमेंट मिळतात. जे खेळाडू ऑनलाइन पैसे भरू शकत नाही त्यांना आरपीसाठी शंभर कॉईन मिळवावे लागतात. त्यासाठी त्यांना दर आठवड्याला एक टास्क दिले जाते. ते पूर्ण करावं लागत असे टास्क दोन महिने कालावधीपर्यंत पूर्ण करावे लागतात. तत्पश्चात आरपी मिळतं. आरपी मिळवण्याच्या नादात मुलं दिवस- रात्र, वेळ, प्रसंग, जागा, अन्नपाणी सर्व काही विसरुन जातात व ते टास्क पूर्ण करतात. स्टेटस पूर्ण करण्यासाठीच मुलं प्रचंड तणावाखाली वावरताना दिसून येतात. परंतु या गोष्टीवर आवर घालण्यासाठी पालकांचा नाईलाज असतो आणि अशाच तो तरुण डिप्रेशनच्या चक्रव्यूह मध्ये ओळखून शेवटी मृत्युला जवळ करतोय.
संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.