
नांदेड : अकरावीच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेला सुरवात होताच पहिल्याच दिवशी वेबसाइटने साथ सोडली. दुसरा दिवशीही गुरुवारी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज सादर करता आले नाहीत. आता वेबसाइटवर सोमवारी (ता.२६) सकाळी अकरापासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, असा संदेश झळकू लागल्याने पालक व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.