esakal | कंधारमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबता थांबेना. कंधार तालुक्यात पुन्हा एका शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतला. तर दुसऱ्या घटनेत अर्सेनीक अल्बम - ३० गोळ्या सांगवी परिसरात वाटप करण्यात आल्या.

कंधारमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता. दोन) घोडज (ता. कंधार) येथे घडली. 

याबाबत अधीक माहिती अशी की, घोडज (ता. कंधार) येथील प्रभाकर गोविंदराव वाडेकर (वय ५६) यांच्या शेतात मागिल काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. ते दरवर्षी कर्ज काढून आपल्या शेतात पेरणी करत. मात्र लहरी निसर्ग त्यांना साथ देत नसे. कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळे ते सतत संकटात येत गेले. त्यामुळे शेतातील उत्पन्न घटले. कर्जाचा डोंगर वाढत गेला. शेवटी त्यांनी आपल्या राहत्या घरी गुरूवारी (ता. दोन) गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती घोडजचे पोलिस पाटील भिमराव संभाजी वाडेकर यांनी कंधार पोलिस ठाण्यात दिली. यावरून कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस नाईक श्री. गोन्टे करत आहेत. 

हेही वाचासत्याग्रह : नांदेडच्या गोदावरी काठी वाळू माफियांच्या विरोधात सत्याग्रह

सांगवी भागात अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप 

नांदेड :  कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगासोबत जगायचं म्हटल्यावर प्रत्येक व्यक्तीने आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुष्य मंत्रालयाने सुचवलेल्या आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप सांगवी प्रभागाच्या नगरसेविका करूणा भीमराव कोकाटे व श्याम कोकाटे यांनी सांगवी प्रभागात करत आहेत.

जोपर्यंत कोरोना या आजारावर औषध मिळणार नाही तोपर्यंत प्रत्येक जण घरी राहू शकत नाही. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या आहारामध्ये संत्री, मोसंबी, शिमला मिर्ची, टोंगरिन्स, द्राक्ष, पालक, आलू, बदाम, लसुन, हळद, मोड आलेली कडधान्य, ग्रीन टी, पेरू, कीविस, लिंबू,स्ट्रॉबेरी, पपई याचे सेवन करावे तसेच स्वत:चा तणाव कमी ठेवा, आपला आहार वेळेवर घ्या, दररोज भरपूर दही खा, पुरेशी झोप घ्या व नियमीत व्यायाम करा असे आवाहान युवक काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष श्याम पाटील कोकाटे हे प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या स्वतः घरी जाऊन गोळ्या देऊन आवाहन करत आहेत.

loading image