नांदेड : पथदिव्यांबाबत लवकरच निर्णय; जयश्री पावडे

महापालिकेची सभा; शिक्षण, महिला, बालकल्याण समिती सदस्यांची निवड
streetlights
streetlightssakal

नांदेड : शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने थकबाकी भरली नसल्यामुळे खंडीत केला आहे. त्यामुळे या विषयावर सत्ताधारी कॉँग्रेस आणि विरोधक भाजपच्या सदस्यांमध्ये चर्चा झाली. महापौर जयश्री पावडे आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी याबाबत माहिती देऊन लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता. चार) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर जयश्री पावडे, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अब्दुल गफार, प्रभारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आॅनलाइन सभा घेण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेवर २३ विषय होते. या विषयांवर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले. शहरातील पथदिव्यांचा प्रश्न विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पथदिवे सुरू झाले नाही तर भाजपच्या वतीने कंदील मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यावर महापौर पावडे आणि आयुक्त डॉ. लहाने यांनी माहिती दिली. महापालिकेतर्फे सध्या नियमित वीजबिल भरणा महावितरणकडे करण्यात येत आहे. मागील दोन चार वर्षापूर्वीची थकबाकी असून त्याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल, अशी माहिती यावेळी दिली.

दरम्यान, शिक्षण, महिला आणि बालकल्याण समितीची मुदत संपल्याने नवीन अकरा सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये कॉँग्रेसच्या दहा तर भाजपच्या एका महिला सदस्याचा समावेश आहे. कॉँग्रेस पक्षाकडून सरिता बिरकले, अपर्णा नेरलकर, संगीता डक पाटील, गितांजली कापुरे, आयेशा बेगम शेख, ज्योत्स्ना गोडबोले, अरशीन कौसर, प्रकाशकौर खालसा, ज्योती कल्याणकर, पूजा पवळे यांचा तर भाजपकडून शांताबाई गोरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे महापौर जयश्री पावडे यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com