esakal | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा- माधवराव पाटील झरीकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड जिल्ह्यातील समाजसेवक तथा स्वच्छ व 'निर्मल गाव 'चे प्रणेते स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर यांनी सांगितले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा- माधवराव पाटील झरीकर

sakal_logo
By
बा. पू. गायखर

लोहा ( जि. नांदेड ) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी स्वच्छ व निर्मल गावचे प्रेणेते स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील समाजसेवक तथा स्वच्छ व 'निर्मल गाव 'चे प्रणेते स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून अतिवृष्टी झाली असूनयामुळे नांदेड ,परभणी, हिंगोली, लातूर संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासहीतअसे संपूर्ण राज्यातील पिके धोक्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात गेल्या दोन महिन्यापासून सतत मुसळधार पाऊस पडून ज्वारी, ऊस ,कापूस, सोयाबीन, केळी पिके आडवी झाली आहेत.

कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटाचा सामना

या अगोदर अगोदर मूग व उडीद पिकाचे ही संततधार पडणार्‍या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आता सोयाबीनलाही मोड फुटले आहेत. ऊस, केळी, ज्वारी, कापूस आडवा झाला आहे. शेतकऱ्याची सुगी हाता तोंडाला आलेली वाया गेली आहे. गेल्या चार- पाच वर्षापासून बळीराजाला कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचाआमदार श्यामसुंदर शिंदे कोरोना बाधित, मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

राज्यात शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा

राज्यातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हा या संकट काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तेव्हा राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच केंद्र सरकारने ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असल्यामुळे शेतकऱ्याला राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी एकरी वीस हजार रुपये अनुदान विशेष पॅकेज जाहीर करावे. पिकविमा कंपन्यांनी सरसकट राज्यात पिक विमा मंजूर करावा संपूर्ण राज्यात शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी  माधवराव पाटील झरीकर यांनी केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे