पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट, शुक्रवारी २२२ जण कोरोनामुक्त, १७० पॉझिटिव्ह 

File Photo
File Photo

नांदेड - मागील तीन महिण्यांपासून कोरोनाची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती. त्यामुळे कोरोना कधी आटोक्यात येईल हे जिल्हा प्रशासनासमोर सर्वात मोठे आवाहन होते. शुक्रवारी (ता. नऊ) प्राप्त झालेल्या अहवालापैकी केवळ १७० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळंकठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि त्या सोबतच मृत्यूचा आकडा देखील तिक्याच झपाट्याने वाढत होता. त्यामुळे केंद्राच्या आरोग्य पथकाने राज्यसरकारला औरंगाबाद आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागा मार्फत दिवसाला पंधराशेच्या जवळपास संशयितांच्या आरोग्य तपासणी करुन आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी केली जात आहे. गुरुवारी (ता.आठ) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता.नऊ) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार १७१ निगेटिव्ह, १७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७ हजार १७० इतकी झाली आहे. 

एकुण १३ हजार ९०९ रुग्ण कोरोनामुक्त 

दहा दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालय- ३०, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- सात, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमधील १२२, बिलोली- सात, भोकर- एक, हदगाव- दोन, कंधार- एक, मुखेड- सहा, धर्माबाद - सात, नायगाव-१५, अर्धापूर- सात व खासगी रुग्णालयातील २७ असे एकूण २२२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १३ हजार ९०९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

 दोन हजार ७१० बाधित रुग्णावर उपचार सुरू 

शुक्रवारी नांदेड महापालिका हद्दीत- ९७, नांदेड ग्रामीण-११, हिमायतनगर- एक, बिलोली- तीन, कंधार- तीन, लोहा- तीन, माहूर- आठ, भोकर- एक, उमरी- एक, अर्धापूर- चार, मुखेड- १८, हदगाव- एक, किनवट-१२, हिंगोली- दोन, परभणी- तीन, यवतमाळ -एक असे १७० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार १७० बाधितांची संख्या झाली आहे. यापैकी १३ हजार ९०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या दोन हजार ७१० बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत प्रयोग शाळेत ६२३ स्वॅब अहवालाची तपासणी सुरू होती. सध्या शुक्रवारी शासकीय रूग्णालयात ६८, जिल्हा रूग्णालयात ५५ व शसकीय आयुर्वेदिक रूग्णालयात ३५ खाटा शिल्लक आहेत. 

नांदेड कोरोना मीटर ः

 शुक्रवारी पॉझिटिव्ह- १७० 
शुक्रवारी कोरोनामुक्त- २२२ 
शुक्रवारी मृत्यू- शुन्य 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- १७ हजार १७० 
एकूण कोरोनामुक्त- १३ हजार ९०९ 
एकूण मृत्यू- ४४८ 
गंभीर रुग्ण- ६३ 
अहवाल प्रतिक्षा- ६२३ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com