

Nanded Farmers
sakal
देगलूर : तालुक्यातील खरीप हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम पैसेवारी अहवालानुसार तालुक्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती अधिकृतरीत्या स्पष्ट झाली आहे. तालुका महसूल प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात ७ महसूल मंडळांची खरीपची अंतिम पैसेवारी केवळ ३६ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे; परंतु, ओल्या दुष्काळाची नोंद होऊनही विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.