

देगलूर: शहरातील जुन्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागाने तब्बल सहा वेळा पत्रव्यवहार व संदर्भ देऊनही संबंधित कंत्राटदाराने कामाकडे दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची पकड सैल झाली की, कंत्राटदारालाच अभय दिले जात आहे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.