Deglur Bypoll : देगलूर पोटनिवडणुकीसाठी दुपारपर्यंत २२ टक्के मतदान

शहरासह ग्रामीण भागातही मतदारांनी उत्साहात मतदानात सहभाग घेतला असून काही ठिकाणी मतदारांनी मी रांगा लावून मतदानात सहभाग घेतला आहे.
Deglur Bypoll News
Deglur Bypoll Newsesakal

देगलूर (जि.नांदेड) : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी (Deglur Bypoll) शनिवार (ता.30) सकाळी 7 पासून शांततेत व उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी बारा वाजेपर्यंत 22 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर (Jitesh Antapurkar ) यांनी आपल्या आई शितलताई रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह अंतापूर येथे मतदान केले. भाजपाचे उमेदवार माजी आमदार सुभाष पिराजीराव साबणे (Subhash Sabane) यांनी देगलूर येथे सपत्नीक गंगुताई सुभाषराव साबने यांच्यासह मतदान केले तर वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर उत्तमराव इंगोले यांनीही देगलूर येथे सपत्नीक मतदान केले.

Deglur Bypoll News
आर्यन खानला जामीन मिळाला, पण आम्हाला कधी मिळणार?

शहरासह ग्रामीण भागातही मतदारांनी उत्साहात मतदानात सहभाग घेतला असून काही ठिकाणी मतदारांनी मी रांगा लावून मतदानात सहभाग घेतला आहे. दुपारपर्यंत शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान अगदी शांततेत सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com