

Nanded News
esakal
देगलूर: देगलूर आगार परिसरात उभारण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटरच्या कामाला गेल्या दीड वर्षापासून अपेक्षित गती मिळत नसल्याने देगलूरसाठी मंजूर झालेल्या २३ इलेक्ट्रिक बस सध्या इतर मार्गांवर धावत आहेत. परिणामी, स्थानिक प्रवाशांना आधुनिक व पर्यावरणपूरक बससेवेचा लाभ मिळण्यास विलंब होत असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.