

Deglur Sand Mafia
sakal
देगलूर: गेल्या आठवड्यात एकीकडे प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक दिवाळी साजरी करण्यात व्यस्त असताना वाळू माफिया मात्र शासनमान्य घाटांवरून अवैध उपसा करून स्वतःचे ‘उखळ पांढरे’ करण्यात गुंतले होते. या वाळू तस्करीमुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून, माफियांवर कोणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.