
देगलूर : देगलूरमधील मानव्य विकास विद्यालयात दहावीत असताना बस्वदीप रवींद्र बेम्बरे याने केलेल्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. त्याने स्वच्छतेच्या दृष्टीने वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेत डिसेंबर २०२१ ‘ऑटोमेटेड ओरल डिस्चार्ज रिसिव्हिंग सिस्टीम’ या उपकरणाबद्दल संशोधन केले. सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयांत स्वच्छतेसाठी हे उपकरण उपयुक्त ठरणारे आहे. सध्या तो ‘बी.टेक.’च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे.