

Nanded News
esakal
देगलूर: यावर्षीही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकींना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली. बैठकीसाठी वारंवार आवाहन करूनही यंत्रणा उपस्थित राहत नसल्याने नियोजन प्रक्रियेलाच खीळ बसत आहे.
पाणीटंचाईसारख्या ज्वलंत प्रश्नावरही अधिकारी-कर्मचारी उदासीन असल्याचे चित्र आहे. वेळेवर बैठका न घेणे, निर्णय प्रलंबित ठेवणे आणि प्रत्यक्ष कामांकडे दुर्लक्ष करणे यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. दरम्यान, येथील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जाधवर हे खात्यांतर्गत प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेलेले आहेत.