Raju Thombre
sakal
अर्धापूर - ना खासगी शिकवणी, ना घरात शैक्षणिक वातावरण असतानाही देळूब बुद्रुक (ता. अर्धापूर, जि. नांदेड) सारख्या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील तरुण राजू बालाजीराव ठोंबरे याने एमपीएससीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. त्याने खासगी शिकवणीचे काम, खासगी कंपनीत नोकरी करत हे यश संपादन केले. तो पोलिस आता उपनिरीक्षक झाला असून, नियुक्ती अमरावती परिक्षेत्रात मिळाली आहे.