Maharashtra Agriculture : धर्माबादच्या मिरचीचा ठसका अटकेपार; कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यासह विदेशातून होतेय मोठी मागणी
Dharmabad Chilli : धर्माबादच्या मिरची पावडरची मागणी कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील रोजगार निर्माण आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली आहे.
धर्माबाद : शहरातील काही व्यापारी मिरची पावडर बनवून पॅकिंग करून राज्यासह परराज्यात पाठवत आहेत. मिरचीचे देठ काढण्यापासून ते मिरची पावडरची पॅकिंग करण्यापर्यंतच्या उद्योगात शहरातील जवळपास दीड हजार लोकांना रोजगार मिळाला.