रेमडेसिव्ह इंजेक्शनची मागणी दहा हजाराची, पुरवठा मात्र हजाराने 

File photo
File photo

नांदेड ः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती हाताबाहेर जात आहे. जिल्हा प्रशासनाकडुन कितीही विनवणी केली तरीही, नागरिकांना त्याचा काही एक फरक पडला नाही. काम असताना देखील घराबाहेर पडून नागरीक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. परंतु ज्यांच्यावर परिस्थिती ओढवली आहे, असे परिवार रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने हतबल होताना दिसून येत आहेत. सध्या जिल्ह्याची रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी दहा हजार इतकी असताना देखील दिवसाला आठशे ते नऊशे इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. 

रविवारी (ता. चार) नागपूरस्थित औषध भांडाराकडुन नांदेडच्या ४० खासगी औषधी दुकानांवर चार हजार ४४४ इंजेक्शन मिळाले होते. खासगी कोविड सेंटर व मेडीकल स्टोअरच्या मागणीनुसार त्यांना रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी सोमवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत शहरातील ४० औषधी दुकानावर दीड हजार इंजेक्शन शिल्लक होती. असे असताना देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोनाचा रिपोर्ट, सिटीस्कॅन व आधार कार्ड दाखवून देखील वेळेवर इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. 

भांबांवलेल्या नातेवाईकांनी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी इतकेच नव्हे तर अन्न व औषध प्रशासनाचे शासकीय कार्यालयाचा शोध घेत त्यांच्याकडे इंजेक्शन मिळावे, म्हणून अक्षरशा लोटांगण घालत होते. हतबल झालेले प्रशासनातील अधिकारी मेडीकलवरील शिल्लक औषधी साठ्याचा आढावा घेऊन मोठ्या कष्टाने गरजवंत कोरोना बाधितांच्या नातेवाईकांकडे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत होते. 

विशेष म्हणजे खासगी रुग्णालयाने सुरु केलेल्या कोविड सेंटरसाठी किमान दोनशे रेमडेसिव्हर इंजेक्शन राखुन ठेवून मगच बाहेरच्या ग्राहकास इंजेक्शन द्यायचे की नाही. याबद्दल विचार करत आहेत. तर काही नातेवाईक वशिलेबाजीने गरज नसताना एकापेक्षा अधिक इंजेक्शन खरेदी करत असल्यामुळे देखील ज्या बाधितांना खरंच रेमडेसिव्हर इंजेक्शनची अत्यंत गरज अशा गरजवंतांना वेळेवर इंजेक्शन मिळत नाही. 

सोमवारी सायंकाळपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाकडे २०८ व जिल्हा रुग्णालयाकडे एक हजार ३५१ तर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाकडे केवळ ३० रेमडेसिव्हर इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विशेष म्हणजे औषधी दुकांनदारांनी ना नफा ना तोटा या तत्वावर १५ ते २० टक्के मार्जीनवर इंजेक्शन विक्री करणे अपेक्षित आहे. परंतु अनेक औषधी दुकानदारांकडून इंजेक्शनाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर लुट केली जात असल्याचे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचा अनुभव आहे. मात्र आपला जीवाभावाचा माणूस वाचला तर पैशाचे काय? म्हणून अनेक जण परिस्थिती नसताना देखील उसनवारी करत तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत तरी नागपूरहून कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन उपलब्ध झाले नव्हते. मध्यरात्री किंवा मंगळवारी सकाळी आठशे ते नऊशे इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 
 

सध्या सिप्ला, हेटेरो, मायलन व झायडस कॉडिगा या नागपूरस्थित चार औषध कंपन्यांमार्फत जास्तीत जास्त इंजेक्शनाचे डोस कसे उपलब्ध होतील. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष आहे. इंजेक्शनांच्या उपलब्धतेनुसार व स्थानिक औषधी दुकानदारांच्या मागणीनुसार रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 
- रोहित राठोड, सहायक आयुक्त, अन्न व औषध विभाग,नांदेड

नांदेड शहरातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे किरकोळ औषध विक्रेते 
  
आश्विनी मेडीकल, आश्विनी हॉस्पिटल (९८५०२३३१००), साई मेडीको, यशोसाई हॉस्पिटल (९८५०२३३१००), भगवती मेडीकल, भगवती हॉस्पिटल (७०२००९४६२६), कोळेकर मेडीकल, आशा हॉस्पिटल (९७८७४११११९५), निर्मल फार्मा, निर्मल हॉस्पिटल (९७६६६९९१२८), अष्टविनायक मेडीकल, अष्टविनायक हॉस्पिटल (९८२२२९९५८३), उमेश मेडीकल, काकांडीकर हॉस्पिटल (७७७४९७७८५७), गौरी किशन मेडीकल, रेणुकाई हॉस्पिटल (८५५१०८३४१०), माऊली मेडीकल, विठाई हॉस्पिटल (९८२२१८१९९०), गुरूजी औषधालय, गुरूजी रूग्णालय (८२०८९००९५७११), पंतप्रधान जन औषधी, विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (९८२२२९९५८३), श्रीनाथ मेडीकल वर्कशॉप, नांदेड (९४२२१७०३३०), वट्टमवार मेडीकल, नवोदया किटीकल केअर (७०५७५२४२७६), साईकृपा मेडीकल, साईकृपा हॉस्पिटल, मालेगाव रोड (९९६०१८८१२८), रवी फार्मसी, विजन हॉस्पिटल ( ९९२२६८२८२२), विजन फार्मा, विजन मल्टीरपेशालीटी (९९२२६६२८२२), संजीवनी मेडीकल, संजीवनी हॉस्पिटल (७००९८९५९०९), समर्पन मेडीकल, न्यु यशोदा हॉस्पिटल (८४२१६६३३७१), मानसी मेडीकल, सनशाईन कोविड सेंटर (९८७३०८०७५९), श्रीकृष्णा फार्मसी, अपेक्षा हॉस्पिटल (९४२१८३८८४८), सिध्दात फार्मसी, फिनिक्स हॉस्पिटल (९४०३२२१०८५), श्री मेडीकल, ठक्करवाड नर्सिंग होम ( ९३७३५१६९१२), तुकामाई मेडीकल, धन्वंतरी कोविड सेंटर (८८०५९५९७०२), नांदेड मेडीकल स्टोअर्स, नांदेड किटीकल केअर सेंटर ( ९१७५१०७२२८), परमी मेडीकल, डेल्टा हॉस्पिटल (९३२५९२६३४७), व्यंकटेश मेडीकल, सह्याद्री हॉस्पिटल (८३९०३४३६३३), लोटस मेडीकल, लोटस हॉस्पिटल (९०११४९७५०१), देवगीरी मेडीकल, देवगीरी हॉस्पिटल, जय जिजाऊ मेडीकल, तिरूमला हॉस्पिटल ( ८६२३९००४३२), तुळसाई मेडीकल, समर्थ अर्थोपेडीक हॉस्पिटल (७७०९६३११२६), गोदावरी मेडीकल, गोदावरी हॉस्पिटल (८९९९७५५६४१), आधार मेडीकल, आधार हॉस्पिटल (९७०३२९७२९७), शिवतुळजा मेडीकल, उमरेकर हॉस्पिटल (८८०५१०३९१२), अ. निरामय मेडीकल, निरामय हॉस्पिटल (९४२२४१७३०२), जगदंब मेडीकल, जीवक कोविड सेंटर (७७७६०८९७७८), मॅक्स मेडीकल, मॅक्स हॉस्पिटल (९०२८५८००६३), सारीया मेडीकल, सारीया हॉस्पिटल (९७६३२९७२९७), ग्लोबल मेडीकल, ग्लोबल हॉस्पिटल ( ९४२३६९३३६९), सहयोग मेडीकल, सहयोग हॉस्पिटल (९७६७३७३९९९), कोलंबिया फार्मा, स्वामी विवेकानंद फार्मा (९४२२१७०२१३). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com