नांदेड शहर विकास आणि वैद्यकीय सुविधांसाठी २०० कोटींची सीएमकडे मागणी- आमदार बालाजी कल्याणकर 

प्रल्हाद कांबळे
Monday, 10 August 2020

झूम मीटिंगद्वारे संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्या मीटिंगमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे नांदेड शहरासाठी वैद्यकीय विभागाला १०० कोटीचा निधी तसेच नांदेड शहराच्या विकासासाठी १०० कोटी असा २०० कोटी रुपयांची मागणी केली. 

नांदेड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या आमदारांसोबत रविवारी (ता. नऊ) दुपारी झूम मीटिंगद्वारे संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्या मीटिंगमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे नांदेड शहरासाठी वैद्यकीय विभागाला १०० कोटीचा निधी तसेच नांदेड शहराच्या विकासासाठी १०० कोटी असा २०० कोटी रुपयांची मागणी केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील सर्व आमदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी झूम मीटिंगद्वारे बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातील अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्री अनुदान अंतर्गत व विशेष रस्ता मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत नांदेड शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे असे आमदार कल्याणकर यांनी सांगितले. या काळात नांदेड शहरासाठी वैद्यकीय विभागाला शंभर कोटींचा निधी देण्याची गरज आहे.

उत्तर मतदारसंघात १०० खाटांचे नवीन रुग्णालय सुरु करा

जिल्ह्यातील सर्वच रुग्ण विष्णुपूरी येथील शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जात आहेत. उत्तर नांदेड मतदारसंघातील रुग्णांना येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे उत्तर मतदारसंघात १०० खाटांचे नवीन रुग्णालय मंजूर करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. १०० खाटांच्या नवीन रुग्णालयाचा प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. दरम्यान नांदेड शहरामध्ये देगलूर नाका भागात महानगरपालिकेचे हैदरबाग येथे रुग्णालय आहे. सदरील हॉस्पिटल ओपीडीमध्ये दररोज दीड हजार ते दोन हजार रुग्ण तपासले जातात. परंतु तेथे फक्त आठ वैद्यकीय अधिकाऱ्यावर दवाखान्यात चालतो. त्यामुळे तेथे अधिकारी वाढवण्याची गरज आहे.

हेही वाचा -  नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या श्रीगणेश मंडळांसाठी काय आहेत सूचना ? वाचा...

जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे

सदरील हॉस्पिटलची इमारत फार छोटी झाली आहे. त्यामुळे नवीन इमारत व वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवास्थान बांधकाम करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी द्यावा हैदरबाग रुग्णालयात सीपीएससी कोर्स चालू करावा जेणेकरून एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या मागे दोन डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांची मंजुरी मिळेल व २४ तास रुग्णांना सेवा देण्याची सोय होईल. जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. सध्या दोन-तीन नवीन खाजगी रुग्णालय साठी चालू करण्यात आले आहेत. तिथे पण खाटा शिल्लक नाहीत. जिल्हाधिकारी यांनी खासगी रुग्णालयांना सेंटर सुरू करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. परंतु अद्यापही खाजगी रुग्णालयात सेंटर सुरू करण्यात आलेले नाही.

ग्रामिण भागातील रुग्णालयाला २५ कोटीची गरज

ही बाब आमदार श्री. कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. नांदेडमध्ये आयटीआय पॉलिटेक्निक कॉलेज, डीएड वसतीगृह सेंटरकरिता ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आदेशित करावे. जेणेकरून कोविड रुग्णांची गैरसोय टाळता येईल. माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची सुद्धा परिस्थिती फार बिकट आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र त्या दुरुस्तीसाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सुद्धा २५ कोटीचा निधी हवा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अद्यापही काही बँका कर्ज उपलब्ध करून देत नसून नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Rs 200 crore from CM for city development and medical facilities - MLA Balaji Kalyankar nanded news