
देगलूर : येथील वारकरी संप्रदायाचे मूळ घराणे असलेल्या गुंडा महाराज संस्थानच्या पायी दिंडी सोहळ्याला सुमारे २३० वर्षांची परंपरा आहे. विठ्ठल नामाचा गजर करीत दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थानची दिंडी रविवारी (ता. १५) येथून हरिनामाचा गजर करीत मोठ्या भक्तिभावाने मार्गस्थ झाली.