Desi Mango Tree : गावरान आंबा आता नष्ट होण्याच्या मार्गावर; पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर होते एकतरी आंब्याचे झाड
Traditional Farming : कधीकाळी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर असणारा गावरान आंबा आता दुर्मिळ झाला आहे. झाडे तोडल्याने आणि शेतीच्या बदलत्या पद्धतींमुळे हा पारंपरिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
शिवणी : कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीच्या बांधावर एक तरी आंब्याची झाड असायचे. परंतु, आज मात्र कुठेतरी एखादे झाड पहावयास मिळत आहे. त्यामुळे मुबलक मिळणारा गावरान आंबा आता दुरापास्त झाला आहे.