Crowd of devotees surges at Mahurgad for the Parikrama on Narali Purnima
sakal
पुसद - श्रावणातील नारळी पौर्णिमा... माहूरच्या डोंगररांगांवर पसरलेले हिरवेगार आच्छादन... दाट जंगलातून वाट काढत पुढे सरकणाऱ्या भाविकांच्या रांगा... ओठांवर अखंड दत्तनाम आणि अंतःकरणात श्री दत्तगुरूंच्या चरणांचे दर्शन घेण्याची आस! अशा भक्तिमय वातावरणात माहूरगडावर सुरू असलेल्या श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमेने भक्तीचा महापूर उसळला आहे. सुमारे २५ किलोमीटरच्या या परिक्रमेतील २७ तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत लाखो भाविकांनी दत्तनामाचा जयघोष करीत गडाला प्रदक्षिणा घातली.