अनुसूचित जमातीच्या अमंलबजावणीसाठी धनगर समाजाने असे केले आंदोलन...

शिवचरण वावळे
Wednesday, 19 August 2020

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजन उपोषणे, आंदोलने करुन सरकराचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. धनगर समाजाच्या वतीने देखील पोस्टकार्ड आंदोलन करुन अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नांदेड : अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीपासून ते ता.२४ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीने जय मल्हार सेनेच्या माध्यमातून राज्यभरातून ११ लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच धर्तीवर 
येथील खंडोबा चौक तरोडा (बु.) नांदेड चौकात धनगर समाजाचे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी पोस्टकार्ड आंदोलन करण्यात आले. 

ता.१३ ते २४ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातून ११ लक्ष पोस्टकार्ड राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे पाठवून औरंगाबाद येथे जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातून गाव वस्तीमधुन अशाप्रकारे आंदोलन म्हणून नांदेड शहरातील तरोडा येथे असलेला खंडोबा चौकात पोस्टकार्ड आंदोलन करण्यात आले. प्रथम खंडोबा मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पुजन जय मल्हार सेनेचे मार्गदर्शक निवृत्त अधिकारी डी.एम. खटके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खंडोबा चौकात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून पोस्टकार्ड आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा- महाआघाडीतील खासदार व आमदारामध्ये पाण्यावरुन कलगीतुरा, कुठे ते वाचा...?
यांची होती उपस्थिती 

या वेळी व्यंकटराव नाईक, मारूती चिंतले (राज्य सचिव), एकनाथ धमणे (युवा जिल्हाध्यक्ष), विठ्ठल खोंडे तरोडेकर (शहर जिल्हाध्यक्ष), खंडू तुप्पेकर (नांदेड तालुकाध्यक्ष), तातेराव तुप्पेकर, सुरेश तुप्पेकर, गोविंद तुप्पेकर, मुंजाजी मेकाले, शिवाजी लोखंडे, कैलास तुप्पेकर, सुरज कानोडे, पवन खोंडे, बाळु खोंडे, माधव झारे, बालाजी पाटील नारे, बाबुराव विरकर, प्रा. विष्णु आष्टुरकर, श्रीपत डाके, गौरव चिंतले, उपस्थित होते.

हेही वाचा- भक्तीचा बाजार मांडणाऱ्या भोंदूबाबांच्या नादी लागू नका....कोण म्हणाले वाचा...

४० वर्षापासून समाजाचा सनदशीर मार्गाने  लढा
महाराष्ट्रातील धनगर समाज हा घटनेच्या तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमातीत आहे. परंतू, राजकीय इच्छाशक्ती अभावी गेल्या ७० वर्षापासून धनगर समाजावर अन्याय होत आला आहे. गेल्या ४० वर्षापासून हा लढा सनदशीर मार्गाने धनगर समाज लढत आहे. जय मल्हार सेनेच्या वतीने यापूर्वी राज्यव्यापी रेल रोको, वर्षा बंगल्यावरील आंदोलन, नागपूर विधान भवनावरील मोर्चा अशारितीने मोर्चे, धरणे आंदोलने आणि आता ११ लक्ष पोस्टकार्ड आंदोलन सुरू आहे.
- मारूती चिंतले, राज्य सचिव, जय मल्हार सेना. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar Samaj Did This For The Implementation Of Scheduled Tribes Nanded News