

Nanded Municipal Corporation
esakal
धर्माबाद: शहरातील रत्नाळी शिवारात उभारण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उपनगराध्यक्ष शंकर बोलमवाड यांनी नुकतीच पाहणी केली. ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून खत निर्मिती करण्याच्या उद्देशाने तीन एकर ३४ गुंठे जागा खरेदी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला असला तरी काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे बोलमवाड यांच्या निदर्शनास आले. प्रकल्पातील उर्वरित कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करून तो लवकर कार्यान्वित करावा, असे त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.