
नांदेड : नांदेडहून थेट गोवा अशी विमानसेवा जुलै महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. फ्लाय-९१ या नव्या विमान कंपनीने याची घोषणा केली असून, नांदेड विमानतळावरून गोवा आणि बंगळुरू या शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नांदेड-मुंबई या मार्गावरील विमानसेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या नांदेडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.