esakal | राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : चित्रा वाघ
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : चित्रा वाघ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महिलांवर (women) अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सर्वसामान्यांसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर (Employees) राजरोसपणे हल्ले होत आहेत. ठाणे (Thane) जिल्ह्यात महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याकडून प्राणघातक हल्ला झाला, ही गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप भाजप (BJP) महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.

भाजपच्या जिल्हा वैद्यकीय आघाडीतर्फे राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाच्या कार्यशाळेसाठी त्या शुक्रवारी येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या की राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचे सरकार अंदाधुंदपणे वागत आहे.

सरकारकडून सत्तेचा अवमान सुरु आहे. सत्तारुपी उधळलेल्या घोड्याच्या नाकात वेसण घालण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. बलात्कारी, विकृतांना राजाश्रय मिळत आहे. मंत्र्यांवरही आरोप होत आहेत. परंतु कोणतीच कारवाई केली जात नाही.

हेही वाचा: सीबीआयला कागदपत्रांसाठी नकार कशाला, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

राज्य सरकारला अद्यापही महिला आयोगाला अध्यक्ष देता आला नाही. मंत्री यशोमती ठाकूर यांनीही म यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. त्यांच्याही विनंतीला दाद दिली जात नाही, ही शोकांतिका आहे. अध्यक्षाची तातडीने नियुक्ती करून पीडित महिलांना न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा.

-चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप महिला आघाडी

loading image
go to top