esakal | जिल्हा बँकेची निवडणूक अवघ्या एका दिवसावर; मतदारांचा निर्णय पक्का होईना
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता. दोन एप्रिल) होणार आहे. यासाठीची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक अवघ्या एका दिवसावर; मतदारांचा निर्णय पक्का होईना

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना संसर्गाचा कहर सर्वोच्च शिखरावर असताना दुसरीकडे देड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला उधाण आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण तर दुसरीकडे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील दिग्गज नेते हेलिकॅप्टर घेऊन विरोधकाच्या रोडरोलरला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, असे असले तरी एका दिवसावर येऊन ठेपलेल्या बँकेच्या निवडणुकीसाठी मात्र, मतदारांचा निर्णय अजूनही पक्का होईनासा झाला आहे. 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता. दोन एप्रिल) होणार आहे. यासाठीची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे पुत्र प्रविण पाटील चिखलीकर हे संचालकपदासाठी आपले नशीब आजमावित आहेत. येथे त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधव पांडागळे यांच्याशी असली तरी सध्या प्रविण पाटील यांच्याकडे मतदारांची संख्या अधिक असल्याचे मानले जाते. असे असले तरी, प्रवीण चिखलीकर यांना देखील ही निवडणूक सहजासहजी जिंकता येणार नाही. असा कयास देखील दिग्गजांकडून लावण्यात येत आहे. 

हेही वाचा- मुलीच्या बदनामीमुळे आईने मरणाला कवटाळले; भोकर तालुक्यातील प्रकार ः एक आरोपी ताब्यात

मतमोजणीनंतरच असली बाजीगर कोण?

मुखेड तालुक्यातून गंगाधर राठोड निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीप्रणीत समर्थ विकास पॅनलने माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आजघडीला सर्वाधिक मतदार हे गंगाधर राठोड यांच्या कृपेने सहलीवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकंदरीत लोहा, कंधार, मुखेड या तिन्ही तालुक्यातील पात्र मतदारांनी महाआघाडीप्रणीत समर्थ विकास पॅनलच्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यावरुन तळ्यात मळ्यात अशी मतदारांची अवस्था आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतरच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतमोजणीनंतरच असली बाजीगर कोण? हे निश्‍चित ठरेल. 

आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरली असून समर्थ सहकार पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढवणाऱ्या आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत. 

हेही वाचा- नांदेड : जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मरवाळीत बालविवाह रोखला

कोरोना संसर्गातही गुप्त बैठका 

पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन दिग्गज नेत्यांनी जिल्हा बॅंक आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी ताकद पणाला लावली आहे. बॅँकेच्या निवडणुकीसाठी कोरोना संसर्गातही गुप्त बैठका सुरूच असल्याची त्याचबरोबर मतदारांची पळवापळवी अजूनही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. एकूण २१ जागा असून त्यापैकी तीन जागा बिनविरोध निघाल्या आहेत. आता १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. 

loading image