मुखेडमध्ये ५०० खाटांचे तात्पुरते रूग्णालय उभारा, कोण म्हटले ते वाचा... 

सुनील पौलकर
Tuesday, 4 August 2020

मुखेड तालुक्यात काेराेना महामारीच्या साथीने चांगलेच बस्तान बसविले असून दरराेज दहा-पंधरा रूग्ण पाॅझिटीव्ह येत आहेत. यातच आजपर्यंत अनेकजण दगावले सुद्धा आहेत. तसेच मागील चार दिवसापासून मुखेड शहरासह जाहूर, आंबुलगा, बाऱ्हाळी, मुक्रमाबाद आदी ग्रामीण भागातील रूग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने शनिवारी जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी काेव्हीड दवाखान्याची पाहणी केली.

मुखेड (जि.नांदेड) : जिल्हाभरात सध्या मुखेड तालुक्यामध्ये काेव्हीड-१९ च्या रूग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय आयटीआय’मध्ये पाचशे खाटांचे तात्पुरत्या रूग्णालयाची उभारणी करावी व त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचारी यांचे नियाेजन करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी शनिवारी (ता.एक) दिल्याची माहिती तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी दिली.

मागील दीड महिन्यापासून मुखेड तालुक्यात काेराेना महामारीच्या साथीने चांगलेच बस्तान बसविले असून दरराेज दहा-पंधरा रूग्ण पाॅझिटीव्ह येत आहेत. यातच आजपर्यंत अनेकजण दगावले सुद्धा आहेत. तसेच मागील चार दिवसापासून मुखेड शहरासह जाहूर, आंबुलगा, बाऱ्हाळी, मुक्रमाबाद आदी ग्रामीण भागातील रूग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने शनिवारी जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी काेव्हीड दवाखान्याची पाहणी केली. संभाव्य वाढती रूग्ण संख्या पाहता बाऱ्हाळी रस्त्यावरील शासकीय आयटीआयमध्ये पाचशे रूग्णांचे नवीन बेड तयार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

या वेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. बालाजी शिंदे, तहसिलदार काशिनाथ पाटील, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. आनंद पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले, नायब तहसीलदार महेश हांडे, नगर पालिका प्रतिनिधी शंकर कुचेवाड, तलाठी बालाजी बाेरसुरे, पाेलिस पाटील माधव टाकळे, संदीप भुरे आदींची उपस्थिती हाेती.

नागरीकांनी साथराेगापासून सावधता बाळगावी...

पावसाळ्याचे दिवस व साथराेगाच्या प्रादूर्भावाची गती पाहता नागरीकांनी शासनाकडून वेळाेवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करून आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेत सावधानता बाळगावी जेणे करून काेराेनाचा वाढता प्रसार थांबण्यास मदत हाेईल. असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी केले. तसेच येथील काेव्हीड-१९ दवाखान्याची पाहणी करून अंतर्गत आराेग्य व मुबलक आैषधी उपलब्धतेबाबत सूचना देऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले तर नवीन  पाचशे खाटाच्या दवाखान्यात कामासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्तीसाठी स्थानिक पातळीवर भरती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेशित केल्याची माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector of Nanded Dr. Vipin Itankar said a temporary hospital with some beds would be started at Mukhed