esakal | जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

मोटारसायकल चालवत जिल्हाधिकारी डॉ. विपीन नायगावचे आमदार राजेश पवार हे धनज, मेळगाव परिसरात पाहणी. कुंटूर, सांगवी, धनज, मेळगाव रस्त्याची केली पाहणी, रस्ता दुरुस्त होईपर्यंत हायवा टिपरला बंदी.

जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नायगाव तालुक्यतील वाळू वाहतुकीच्या ट्रकमुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावरुन वाहनेच काय पायी सुद्धा चालणे अवघड आहे. परिसरातील शेतकरी, वाहनधारक आणि पादचारी यांच्या तक्रारी येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नायगावचे आमदार राजेश पवार यांच्यासमवते या कुंटुर, मेळगाव, धनज आणि सांगवी या रस्त्याची पाहणी केली.

चक्क दुचाकीवर जिल्हाधिकारी आल्याने या परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले. त्यांनी शेतकऱ्यांना दिलास देत रस्ते दुरुस्त झआल्याशिवाय हायवा ट्रकला परवनागी देउ नये अशा सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.

रस्त्यांची झालेली दुरवस्था माध्यमातून चव्हाट्यावर

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे कुंटूर परिसरातील अनेक गावातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. रस्ते होत्याचे नव्हते झाल्याने या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था माध्यमातून चव्हाट्यावर येताच नायगावचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह या भागात चक्क दुचाकीवरून जाऊन रस्त्यांची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी या रस्त्याची पाहणी करून या भागात आता अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात यापुढे रेतीची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही वाहनाला वाहतूक करता येणार नाही. अशा वाहनांवर तगडी कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हेही वाचामांजरा नदीवर येसगीला ९७ कोटींचा नवीन पुल होणार

रस्त्यात चिखल आणि खड्डे दिसुन आले

वाळूची अवैध वाहतूक आणि रस्त्यांची बिकट अवस्था या विषयी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगवी, धनंज, मेळगाव रस्त्याची पहाणी करण्यासाठी आले होते. रस्त्यात चिखल आणि खड्डे दिसुन आले. शिवाय अंगनवाडीचा खाऊ घेऊन जाणारे वाहन खड्यात अडकुन बसले होते. अंगणवाडीचा खाऊ कर्मचारी डोक्यावरून घेऊन जात होते. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी व आमदार यांची वाहन रस्त्यातच अडकली. त्यामुळे दोघांनीही दुचाकीवरून प्रवास करत रस्त्याची पाहणी केली. 

शेती पीक घेण्यासाठी वापरा वाळू साठा नको

रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर या भागात वाहतुकीसाठी बंदी घालण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिले. या प्रकरणी नायगाव तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कारण लिलाव झाला नसतानाही रेतीची वाहतूक होत असताना तहसीलदार कारवाई करत नसल्याच्या तक्रारी यावेळी अनेकांनी केल्या. या सर्व समस्याची चौकशई करु असा विश्‍वास शेतकऱ्यांना दिली. एवढेच नाही तर आपली शेती पीक घेण्यासाठी वापरा वाळू साठा करण्यासाठी नाही असा सल्लाही त्यांनी दिला.