नांदेडमध्ये कलावंत संघटनेची अशी आहे जिल्हा कार्यकारिणी

फोटो
फोटो

नांदेड : जिल्ह्यातील गायक, वाद्य कलावंत, कलाकारांची एक विशेष बैठक गुरुपौर्णिमा दिनी घेण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुहमेंट प्रणित कलावंत संघटनेची स्थापना करून पदाधिकारी निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ कलावंत शाहीर रमेश गिरी, कार्याध्यक्षपदी ज्यू.जाॅनी लिव्हर रामेश्वर भालेराव, सचिव पत्रकार बाबुराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कलावंत मंडळीला अतिशय वाईट दिवस आले आहेत. या कलाकारांना सरकारने मदत करावी यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुहमेंटच्या वतीने संगीतकार तथा सामाजीक कार्यक्रते प्रमोद गजभारे यांच्या पुढाकाराने प्रशासनाकडे कलावंतांचा प्रश्न लाऊन धरला आहे हा लढा अधिक गतिमान करण्यासाठी गुरुपौर्णिमा दिनी नांदेड जिल्ह्यातील कलावंत मंडळीची एक विशेष बैठक दैनिक पंचनामा कार्यालय येथे घेण्यात आली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुहमेंट

याबैठकिच्या अध्यक्षस्थानी मुहमेंटचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास कांबळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव पत्रकार प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे सरचिटणीस सुभाष लोणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संगीत विभागाचे प्रा.शिवराज शिंदे, बैठकीचे निमंत्रक प्रमोद गजभारे, महानगर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार,  पत्रकार राजकुमार स्वामी, दिनेश सुर्यवंशी, गजानन कानडे, पवन गिरी आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने कलाकार उपस्थिती होते.

कलाकारांना शासनाने तात्काळ मदत केलीच पाहिजे

यावेळी कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यां पूर्वीपासून कार्यक्रम नाहीत व पुढे निश्चित सांगता येत नाही. यामुळे कलाकार आजघडीला कठीण प्रसंगात आहे. कित्येकांची उपासमार होते आहे. या कलाकारांना शासनाने तात्काळ मदत केलीच पाहिजे अशी मागणी करणे व त्यासोबतच अशा अडचणीच्या काळात एकमेकांच्या समस्या सोडविण्यासाठी व शासन प्रशासन स्तरावर कांही विधायक कामे करण्यासाठी कलाकारांचे संघटना आपण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व सर्व संमतीने कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे

कार्यकारिणी पुढील प्रमाणे

अध्यक्ष- शाहिर रमेश गिरी
कार्याध्यक्ष- रामेश्वर भालेराव  (ज्यू.जाॅनी लिव्हर )
संघटक- प्रमोद गजभारे
उपाध्यक्ष - रतन चित्ते, शुध्दोधन कदम
सचिव - बाबुराव पाटील
सहसचिव - शेख नईम
कोषाध्यक्ष - अनिल जमदाडे
सहकोषाध्यक्ष- राहुल मोरे
महिला प्रमुख - सोनाली बळेगावकर

हे आहेत सदस्य

सदस्य - विकास कवठेकर, महेंद्र कदम, किशोर आवटे, भिमराव लोणे,  प्रदिप पंडीत, बुध्दकीर्ती राक्षसमारे,युवराज तारु, संदिप गोवंदे, पुणेगावकर पाटील, सचिन पाईकराव, सल्लागार- प्रा.शिवराज शिंदे, संजय भगत, संजय जगदंबे, सतीश कासेवार, संघरत्न चिखलीकर यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com